भारताची नकारात्मक प्रतिमा निर्माण करणारी अमेरिकेतील प्रसारमाध्यमे त्यांच्याच नागरिकांवर अन्याय करतात ! – भारतीय राजदूत नवतेज सिंह सरना

असे परखड विचार भारतीय शासनकर्ते कधी व्यक्त करतात का ?

भारतीय राजदूत नवतेज सिंह सरना

वॉशिंग्टन – भारतातील विदेशी पत्रकार काही ठराविक बातम्या दाखवतात आणि विकासाच्या संदर्भातील बातम्यांकडे दुर्लक्ष करतात, असा प्रघात पडला आहे, अशी टीका अमेरिकेतील भारताचे राजदूत नवतेज सिंह सरना यांनी येथे एका कार्यक्रमात केली. भारताची नकारात्मक प्रतिमा निर्माण करून अमेरिकेतील प्रसारमाध्यमे अमेरिकेतील नागरिकांवरच अन्याय करत आहेत, असेही ते म्हणाले.

१. सरना यांना अमेरिकेतील प्रसारमाध्यमांतून भारताच्या प्रतिमेविषयी प्रश्‍न विचारण्यात आल्यावर सरना म्हणाले की, हे सूत्र चिंतेचे नाही, तर कीव येणारे आहे. भारत पुढे गेला आहे; मात्र अमेरिकेतील प्रसारमाध्यमे अद्याप मागेच आहेत.

२. सरना पूर्वी अमेरिकेतील भारतीय दूतावासात प्रवक्ता होते. त्या संदर्भात ते म्हणाले की, मी त्या वेळेलाही अमेरिकेतील प्रसारमाध्यमांना समजावण्याचा प्रयत्न केला होता; मात्र त्यात अयशस्वी ठरलो. भारताची योग्य प्रतिमा दाखवणे अमेरिकेलाही आवश्यक आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now