दैनिक सनातन प्रभातमधील लेख वाचून परात्पर गुरु पांडे महाराज यांंनी केलेले कौतुक आणि ‘लग्न’ याशब्दाचा त्यांनी सांगितलेला भावार्थ !

परात्पर गुरु परशराम पांडे महाराज

१. ‘लग्न झाल्यानंतर कसे जीवन जगायचे ?’, हा आदर्श तुम्ही आमच्यासमोर ठेवला आहे !’ अशा शब्दांत परात्पर गुरु पांडे महाराज यांनी कौतुक करणे

‘दैनिक सनातन प्रभातमधील लेख वाचून परात्पर गुरु पांडे महाराज म्हणाले, ‘‘तुमच्या आदर्श जीवनासाठी तुमचे कोटी कोटी अभिनंदन ! परात्पर गुरुदेवांनी तुमचे केलेले कौतुक वाचून मला पुष्कळ आनंद झाला. असेच प्रेम आणि आनंद तुम्ही मला देत रहा ! तुम्ही किती भाग्यवान आहात ! ‘लग्न झाल्यानंतर कसे रहायचे ? कसे जीवन जगायचे ?’, हा आदर्श तुम्ही आमच्यासमोर ठेवला आहे. त्यासाठी तुमचे पुष्कळ अभिनंदन !’’

२. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी ‘लग्न’ या शब्दाचा अर्थ सांगणे

परात्पर गुरु पांडे महाराज यांनी लग्नाच्या वेळी म्हणतात, तो एक श्‍लोक म्हणून दाखवला. त्या श्‍लोकाचा अर्थ असा आहे, ‘लग्न हे शरिराशी न होता हृदयाशी होते; म्हणून त्यामध्ये ‘लग्न’, म्हणजे ‘ल ग न !’ हा तीन अक्षरी शब्द आहे. याचा अर्थ मोठ्या उत्साहाने, मोठ्या प्रयत्नाने, मोठ्या जिगरीने एकमेकांसह वाटचाल करणे, म्हणजे लग्न ! हा अर्थ तुमच्याकडून आम्हाला कळला. शारीरिक प्रेमामुळे एकमेकांमध्ये भांडणे होतात.

३. ‘तरुणपणातील ‘सामर्थ्य’ आणि म्हातारपणात निर्माण होणारा ‘समजूतदारपणा’ दाखवून ‘तुम्ही आमच्यासमोर आदर्श ठेवला आहे’, असे सांगून परात्पर गुरु पांडे महाराज यांनी पुढील जीवनासाठी आशीर्वाद देणे

लग्न कशासाठी करायचे ?, तर संलग्न होण्यासाठी. संलग्न म्हणजे एकमेकांमध्ये मिसळणे, एकमेकांमध्ये समरस होणे. एकमेकांशी एकरूप होणे म्हणजे ‘शिव-पार्वती होणे’. तुमचे लग्न संलग्न होण्यासाठी, तसेच सन्मानाने, हृदयाने आणि मनाने एकत्र होण्यासाठी झाले. शरीर, मन आणि आत्मा यांमुळे दोघांचे मन एकत्र येते. म्हातारपणी मन एकत्र येण्यास वेळ लागतो. तुम्ही लग्नानंतर एक आदर्श निर्माण केला आहे, म्हणजे तरुणपणातील सामर्थ्य आणि म्हातारपणात निर्माण होणारा समजूतदारपणा दाखवून तुम्ही आमच्यासमोर आदर्श ठेवला आहे. तुम्ही पुष्कळ भाग्यवान आहात; कारण तुम्ही गुरुदेवांच्या कुशीत आहात. तुम्ही मागच्या जन्मी पुण्य केले आहे. ‘यापुढे तुमची एकत्र वाटचाल होवो’, ही परमेश्‍वराच्या चरणी प्रार्थना करतो.’’ शेवटी त्यांंनी सांगितले, ‘‘म्हातारपणीही शिष्यावस्थेत राहून सतत शिकण्याच्या स्थितीत रहा !’’

‘हे श्रीकृष्णा, प.पू. बाबा, तुम्हीच आम्हाला शिष्यावस्थेत आणि शिकण्याच्या स्थितीत अखंड ठेवा. तुमचे आशीर्वाद सदैव आमच्या समवेत राहू देत’, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.

‘प.पू. गुरुमाऊली, तुम्ही आम्हाला जे ध्येय सुचवले, ते पूर्ण होण्यासाठी ‘आमच्यात भाव, तळमळ, चैतन्य आणि शक्ती निर्माण करा’, अशी तुमच्या चरणी संपूर्णपणे शरण येऊन प्रार्थना करत आहोत.’

– सौ. रोेहिणी आणि श्री. वाल्मीक भुकन, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (११.४.२०१८)