हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्ह्यातील एप्रिल २०१८ च्या पहिल्या सप्ताहातील प्रसारकार्य

१. भाईंदर (प.) येथे हिंदु धर्मजागृती सभा : ‘८.४.२०१८ यादिवशी भाईंदर (प.) येथे हिंदु धर्मजागृती सभा झाली. या सभेला ६०० धर्मप्रेमी उपस्थित होते. या वेळी भाईंदर येथील ७५ वर्षे जुने असलेले श्री गणेश मंदिर वाचवण्याचे आणि ‘राष्ट्र आणि धर्म’ कार्यासाठी संघटित होण्याचे आवाहन करण्यात आले. सभेच्या प्रसारासाठी २१ ठिकाणी झालेल्या बैठकांद्वारे ३५० हिंदूंपर्यंत ‘राष्ट्र आणि धर्म’ हा विषय पोहोचला.

१ अ. सभा यशस्वी होण्यासाठी हिंदुत्वनिष्ठांनी केलेले सहकार्य ! : या सभेसाठी ‘जगदीश डेकोरेटर’ने व्यासपीठ, कनात इत्यादी साहित्य अल्प दरात उपलब्ध करून दिले. स्थानिक धर्मप्रेमी श्री. प्रसाद गोखले यांनी बैठकांसाठी ४ वेळा त्यांचे सभागृह विनामूल्य उपलब्ध करून दिले. ‘कृष्णा बलराम साउंड’ने सभेसाठी उत्तम प्रतीची ध्वनीक्षेपक यंत्रणा अल्प दरात उपलब्ध करून दिली. स्थानिक पत्रकार तथा माहिती अधिकार कार्यकर्ते श्री. प्रदीप भाटिया यांनी प्रसार करणार्‍या धर्मप्रेमींच्या भोजनाची सोय केली.

२. पत्रलेखनाच्या माध्यमातून जागृती : २ ते ८ एप्रिल २०१८ या सप्ताहात ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित ७ विषयांवर २१ मराठी नियतकालिकांना पत्रे पाठवण्यात आली. यांपैकी ५३ पत्रे प्रसिद्ध झाली. एका विषयावर पाठवण्यात आलेला १ लेख प्रसिद्ध झाला.’

– श्री. सागर चोपदार, मुंबई जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती. (एप्रिल २०१८)