हिंदु जनजागृती समितीचे रायगड जिल्ह्यातील मार्च २०१८ मासातील प्रसारकार्य !

१. होळीनिमित्त होणारे अपप्रकार थांबवण्यासाठी प्रबोधन

‘होळीनिमित्त होणारे अपप्रकार थांबवावेत’, या मागणीचे निवेदन पेण पोलीस ठाण्यात देण्यात आले.

२. शिवजयंतीनिमित्त व्याख्यानांच्या माध्यमातून जागृती

४ मार्च या दिवशी तिथीनुसार साजर्‍या झालेल्या शिवजयंतीनिमित्त रायगड जिल्ह्यात ७ ठिकाणी शिवचरित्रातून प्रेरणा घेण्यासाठी व्याख्यानांच्या माध्यमातून जागृती करण्यात आली.

२ अ. फणसडोंगरी, पेण : या ठिकाणी हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनीष माळी यांनी विषय मांडला. व्याख्यानाच्या आयोजनासाठी ‘शिवप्रतिष्ठान मित्रमंडळा’चे धर्मप्रेमी श्री. शुभम् पाटील यांनी पुढाकार घेतला. या वेळी सनातन-निर्मित ग्रंथांचे प्रदर्शन लावण्यात आले होते. श्री. शुभम् पाटील यांनी साधनेचे महत्त्व जाणून घेऊन नामजप करण्यास आरंभ केला आहे.

२ आ. कोलाड : येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. जांभळेगुरुजी यांनी विषय मांडला. शिवसेनेचे उपतालुकाप्रमुख श्री. चंद्रकांत लोखंडे यांनी कार्यक्रमासाठी अनुमती दिली. या वेळी ‘क्रांतिकारकांची माहिती देणारे फ्लेक्सचे प्रदर्शन’ लावण्यात आले होते.

२ इ. आवरे, उरण : येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद पोशे यांनी विषय मांडला. शिवसेनेचे श्री. कौशिक ठाकूरगुरुजी यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

२ ई. वशेणी, उरण : येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. मिलिंद पोशे यांनी विषय मांडला. धर्मप्रेमी श्री. यशवंत ठाकूर यांनी कार्यक्रमासाठी सहकार्य केले.

२ उ. मचकूर, तळोजा : येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. योगेश ठाकूर यांनी विषय मांडला. या कार्यक्रमाचे आयोजन ‘स्वराज्य मावळा प्रतिष्ठान’चे धर्मप्रेमी श्री. गुरुनाथ मुंबईकर यांनी केले होते.

२ ऊ. सांगुर्ली : पनवेल जवळील सांगुर्ली येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. नरेंद्र सुर्वे आणि सनातनच्या सौ. पुष्पा चौगुले यांनी विषय मांडला. या कार्यक्रमासाठी धर्मप्रेमी सर्वश्री अमर माटे, रूपेश पारधी आणि योगेश वाजेकर यांनी पुढाकार घेतला.

२ ए. शिर्की, पेण : येथे हिंदु जनजागृती समितीचे श्री. जांभळेगुरुजी यांनी विषय मांडला.

३. प्रभादेवी येथील ‘श्री सिद्धिविनायक मंदिरा’च्या माजी विश्‍वस्तांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई व्हावी, यासाठी जनजागृती !

३ अ. नवीन पनवेल येथे स्वाक्षरी मोहीम ! : १०.३.२०१८ या दिवशी नवीन पनवेल येथे स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली. या वेळी अनेक हिंदूंनी स्वाक्षरी देऊन ‘माजी विश्‍वस्तांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात कारवाई व्हावी’, या समितीच्या मागणीला पाठिंबा दर्शवला.

३ आ. तळोजा, मचकूर येथे स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन ! : ११.३.२०१८ या दिवशी तळोजा, मचकूर या ठिकाणी धर्मध्वजाच्या जवळील ‘स्वराज्य मावळा प्रतिष्ठान’चे श्री. गुरुनाथ मुंबईकर यांनी पुढाकार घेऊन स्वाक्षरी मोहिमेचे आयोजन केले.

३ इ. रामनाथ येथे पत्रकार परिषदेचे आयोजन ! : १२.३.२०१८ या दिवशी रामनाथ (अलिबाग) या ठिकाणी पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी विविध वृत्तपत्रांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

४. गुढीपाडव्यानिमित्त प्रबोधन !

४ अ. कामोठे आणि कळंबोली येथे नववर्षानिमित्त स्वागत यात्रेचे आयोजन ! : येथे सांस्कृतिक आणि सामाजिक सेवा संस्थांच्या वतीने नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती प्रणित ‘रणरागिणी’ या शाखेनेही सहभाग घेतला होता. या वेळी सनातन संस्थेच्या बालसाधकांनी ‘संस्कृती संवर्धनासाठी प्रयत्नशील व्हावे’, याविषयी माहिती देणारे फलक हातात धरून प्रबोधन केले. ‘रणरागिणी’ शाखेच्या वतीने स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. या ‘प्रात्यक्षिकांचे सादरीकरण’ हे फेरीचे महत्त्वाचे आकर्षण ठरले. या फेरीत समितीचे प्रथमोपचार पथकही सहभागी झाले होते.

४ आ. शिरढोण या गावी फेरीचे आयोजन ! : पनवेल जवळच्या शिरढोण या गावात धर्माभिमान्यांनी फेरीचे आयोजन केले होते. या वेळी धर्मप्रेमी साधक श्री. विनायक वाकडीकर आणि श्री. मच्छिंद्र पवार यांनी मारुति मंदिराजवळ गुढीपाडव्याचे महत्त्व बिंबवणारी भीत्तीपत्रके लावून प्रबोधन केले.

४ इ. हस्तपत्रके आणि भीत्तीपत्रके यांद्वारे प्रबोधन ! : गुढीपाडव्याच्या निमित्ताने रायगड जिल्ह्यात १ सहस्र ३२० हस्तपत्रकांचे वितरण करून आणि १८१ भिंतीपत्रके लावून प्रबोधन करण्यात आले, तसेच अनेक ठिकाणी फलक लेखन करून नवीन वर्षाविषयी जागृती केली गेली.

५. रामनवमीनिमित्त अध्यात्मप्रसार !

‘रामनवमी उत्सव समिती, रोडपाली, कळंबोली’ या समितीने रामनवमी निमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. यात सनातन संस्थेला ‘हिंदु राष्ट्राची स्थापना, ही काळाची आवश्यकता’, या विषयावर प्रबोधन करण्यासाठी आमंत्रित केले होते. श्री. योगेश ठाकूर यांनी ‘श्रीरामाची वैशिष्ट्ये, हिंदूंची सद्यःस्थिती आणि त्यांवरील उपाय, म्हणजे हिंदु राष्ट्र’ यांविषयी माहिती दिली.

६. हिंदु जनजागृती समितीचे महाराष्ट्र राज्य संघटक श्री. सुनील घनवट यांचा रायगड जिल्हा दौरा आणि अनेक मान्यवरांच्या भेटी !

रायगड जिल्ह्यातील पनवेल आणि रामनाथ (अलिबाग) या तालुक्यांत हिंदु जनजागृती समितीचे ‘महाराष्ट्र राज्य संघटक’ श्री. सुनील घनवट यांनी धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ, तसेच अधिवक्ते यांच्या भेटी घेतल्या. श्री. घनवट यांनी ‘राष्ट्र आणि धर्म यांची सद्यःस्थिती’ याविषयी मान्यवरांशी चर्चा केली. ‘सर्वांनी संघटित होऊन या आघातांना कसे तोंड देऊ शकतो ?’, याविषयी श्री. घनवट यांनी मार्गदर्शन केले. त्यांच्या या मार्गदर्शनामुळे ‘संघटित होऊन कार्य केल्यास हिंदु राष्ट्र स्थापन करणे सोपे होऊ शकते’, याविषयी धर्मप्रेमींमध्ये आत्मविश्‍वास निर्माण झाला. त्यामुळे सर्वांनी मिळून धर्मजागृती सभा, बैठका, राष्ट्रीय हिंदू आंदोलने, धर्मशिक्षणवर्ग घेणे आदी कृती करण्याचा निर्धार केला.’

– श्री. बळवंत पाठक, रायगड जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती. (१३.४.२०१८)