मार्च २०१८ या मासातील हिंदु जनजागृती समितीचे मुंबई जिल्ह्यातील प्रसारकार्य !

१. पहिल्या सप्ताहात झालेले प्रसारकार्य !

१ अ. होळी आणि शिवजयंती निमित्त व्याख्यानांच्या माध्यमातून जागृती !

१ अ १. भांडुप येथे होळीनिमित्त प्रबोधन ! : येथील ‘सह्याद्रीनगर गणेशोत्सव मित्रमंडळ’ येथे होळीच्या निमित्ताने ‘होळीचे आध्यात्मिक महत्त्व’, तसेच ‘होळीतील अपप्रकार कसे रोखावेत ?’, यांविषयी श्री. सचिन घाग यांनी विषय मांडला. धुलीवंदनाच्या दिवशी श्री. सचिन घाग आणि श्री. गणेश पाटील यांनी परिसरात प्रथमोपचार वाहन फिरवणे आणि फलक लिखाण करणे या सेवा केल्या.

१ अ २. भांडुप येथे शिवजयंतीनिमित्त जागृतीपर उपक्रम ! : शिवजयंतीनिमित्त गावदेवी, भांडुप येथे धर्मप्रेमी श्री. सचिन घाग, टागोरनगर, विक्रोळी (पूर्व) येथे धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील आणि घाटकोपर येथे श्री. विनायक साळुंखे यांनी विषय मांडला. भांडुप आणि घाटकोपर येथे क्रांतीकारकांची माहिती देणारे फ्लेक्स प्रदर्शन लावण्यात आले होते. टागोरनगर येथे स्वसंरक्षण प्रात्यक्षिके दाखवण्यात आली. श्री. गणेश पाटील यांनी प्रबोधनात्मक फलकांचे लेखन केले.

१ आ. पत्रलेखनाच्या माध्यमातून जागृती : २६ फेब्रुवारी ते ४ मार्च २०१८ या सप्ताहात राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संबंधित ७ विषयांवर २० मराठी नियतकालिकांना पत्रे पाठवण्यात आली. यांपैकी ५५ मराठी पत्रे प्रसिद्ध झाली. पत्रलेखन सेवेत श्री. जगन घाणेकर यांनी सहभाग घेतला.

२. दुसर्‍या सप्ताहात झालेले प्रसारकार्य !

२ अ. प्रभादेवी येथील ‘श्री सिद्धिविनायक मंदिरा’च्या माजी भ्रष्ट विश्‍वस्तांवर कारवाई व्हावी, यासाठी आंदोलन ! : ९.३.२०१८ या दिवशी भांडुप (प.) रेल्वे स्थानकाच्या बाहेर आणि १०.३.२०१८ या दिवशी घाटकोपर (पूर्व) रेल्वे स्थानकाच्या बाहेर ‘श्री सिद्धिविनायक मंदिरा’तील माजी विश्‍वस्तांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या विरोधात स्वाक्षरी मोहीम राबवण्यात आली, तसेच आंदोलनही करण्यात आले. भांडुप येथील आंदोलनाच्या सेवेचे दायित्व धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील आणि श्री. सचिन घाग यांनी, तर घाटकोपर येथील आंदोलनाच्या सेवेचे दायित्व श्री. विवेक सावंत अन् श्री. सुभाष अहिर यांनी घेतले होते.

२ आ. पत्रलेखनाच्या माध्यमातून जागृती : ५ ते ११ मार्च २०१८ या सप्ताहात ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित ८ विषयांवर २० मराठी नियतकालिकांना पत्रे पाठवण्यात आली. यांपैकी ४४ पत्रे प्रसिद्ध झाली. पत्रलेखन सेवेत सर्वश्री राहुल पाटेकर, राहुल लोखंडे, संदीप काते, जगन घाणेकर आणि जयेश राणे, त्याचप्रमाणे सौ. शकुंतला बद्दी यांनी सहभाग घेतला.

३. तिसर्‍या सप्ताहातील प्रसारकार्य !

३ अ. पत्रलेखनाच्या माध्यमातून जागृती : १२ ते १८ मार्च २०१८ या सप्ताहात ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित ७ विषयांवर २० मराठी नियतकालिकांना पत्रे पाठवण्यात आली. यांपैकी ५० पत्रे प्रसिद्ध झाली. एका विषयावर पाठवण्यात आलेले ६ लेख प्रसिद्ध झाले. पत्रलेखन सेवेत सर्वश्री राहुल लोखंडे, जगन घाणेकर, जयेश राणे यांनी सहभाग घेतला.

३ आ. नववर्षानिमित्त काढलेल्या शोभा यात्रेच्या माध्यमातून धर्मप्रसार !

३ आ १. सानपाडा : येथील शोभायात्रेत साप्ताहिक सनातन प्रभातचे वाचक-अधिवक्ता संतोष ठाकूर यांनी दैनिक सनातन प्रभातचे अंक प्रायोजित केले होते. त्यांच्या कार्यालयासमोर सनातनच्या साधिकांनी रांगोळी काढली, तसेच शोभायात्रेचे स्वागत केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. लहू गिरमकर यांनी लेझिमपथक आणले होते.

३ आ २. बेलापूर : येथील शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचे सर्वश्री केदार चित्रे, विनायक देशपांडे यांनी दैनिक सनातन प्रभातचे अंक वितरित केले. त्यांना श्री. विनय कोळपकर यांनी सहकार्य केले.

३ आ ३. खारघर : येथील शोभायात्रेत हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते फलक घेऊन सहभागी झाले होते. या वेळी समितीचे श्री. संतोष मांडोळे आणि डॉ. (सौ.) ममता देसाई यांनी अंक वितरित केले.

३ आ ४. भांडुप : मनसेचे माजी विभागप्रमुख श्री. अनिल राजभोज यांनी ‘गुढीपाडवा’ या विषयाची ध्वनीचित्र-चकती पाहून हिंदु जनजागृती समितीचे श्री. सागर चोपदार यांना गुढी उभारण्यासाठी बोलावले होते. या वेळी सामूहिक गुढी उभारण्यात आली. हिंदुत्वनिष्ठ श्री. संतोष ब्रीद यांनी ‘शिवनेरी’ येथे आणि श्री. संदेश घाडीगावकर यांनी ‘टेंभीपाडा’ येथे सामूहिक गुढी उभारली. या वेळी श्री. गणेश पाटील यांनी ‘गुढीपाडव्याची माहिती आणि हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व’ या विषयावर मार्गदर्शन केले.

३ इ. धर्मवीर संभाजी महाराज यांच्या बलीदान दिनाच्या निमित्ताने मूक पदयात्रांचे आयोजन !

३ इ १. ऐरोली : येथील मूक पदयात्रेत हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलेश देशमुख यांनी ‘हिंदु धर्म आणि हिंदु राष्ट्र’ या विषयांवर प्रबोधन केले. धर्मप्रेमी श्री. प्रमोद पाटील यांनी ‘सनातन प्रभात’चे महत्त्व विषद केले. या वेळी दैनिक सनातन प्रभातच्या अंकांचे वितरण करण्यात आले.

३ इ २. कोपरखैरणे : मूक पदयात्रेच्या समारोपाच्या वेळी श्री. नीलेश देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी ‘हिंदु नववर्ष आणि गुढीपाडवा धर्मशास्त्राप्रमाणे कसा साजरा करावा ?’, याची माहिती असलेल्या दैनिक सनातन प्रभातचे अंक वितरित करण्यात आले. या वेळी धर्मप्रेमी श्री. अस्मित कोंडाळकर यांनी स्वतःहून सनातन प्रभातचे महत्त्व सांगितले.

३ ई. भांडुप येथे ‘धर्मवीर संभाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान, तसेच स्वसंरक्षण प्रात्यक्षिके यांचे आयोजन ! : समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकत्र येऊन ‘धर्मवीर संभाजी महाराज बलीदान दिन’ या निमित्ताने ‘धर्मवीर संभाजी महाराज आणि हिंदु राष्ट्र’ या विषयावर व्याख्यान तसेच स्वसंरक्षण प्रात्यक्षिके यांचे आयोजन केले होते. धर्मप्रेमी श्री. सचिन घाग यांनी या विषयावर मार्गदर्शन केले, तर धर्मप्रेमी श्री. प्रतीक नायर यांनी स्वसंरक्षणाची प्रात्यक्षिके करून दाखवली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन धर्मप्रेमी श्री. गणेश पाटील यांनी केले. प्रात्यक्षिके पाहून शिवसेनेचे भांडुप विभाग संघटक श्री. बाबुराव राणे म्हणाले, ‘‘तुम्ही मला ही प्रात्यक्षिके शिकवत असाल, तर मी शिकण्यास सिद्ध आहे.’’

३ उ. ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील चर्चासत्रांत सहभाग !

४. चौथ्या सप्ताहातील प्रसारकार्य

४ अ. पत्रलेखन सेवेद्वारे जागृती : १९ मार्च ते २५ मार्च २०१८ या सप्ताहात ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित ५ विषयांवर २० मराठी नियतकालिकांना पत्रे पाठवण्यात आली. यांपैकी ४७ मराठी पत्रे प्रसिद्ध झाली. या सेवेत सर्वश्री राहुल पाटेकर, जगन घाणेकर, जयेश राणे यांनी सहभाग घेतला.

४ आ. श्रीरामनवमीच्या निमित्ताने जागृती !

४ आ १. भांडुप : भांडुप येथे श्रीरामनवमीच्या निमित्ताने ‘श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स’ या महाविद्यालयाने कीर्तन आणि धर्मजागृतीपर व्याख्यान आयोजित केले होते. या वेळी सनातनचे ग्रंथ प्रदर्शन लावण्यात आले होते. समितीचे श्री. गणेश पाटील यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर श्री. सचिन घाग यांनी उपस्थित श्रीरामभक्तांना ‘श्रीराम आणि रामराज्य’ या विषयावर मार्गदर्शन केले.

४ आ २. घाटकोपर : येथे बजरंग दलाने भव्य फेरीचे आयोजन केले होते. या फेरीत सर्वश्री सुजीत साठे, राजेश कार्येकर, मनीष वाहवल, सचिन घाग आणि गणेश पाटील हे धर्मप्रेमी सहभागी झाले.

५. पाचव्या सप्ताहातील प्रसारकार्य

५ अ. पत्रलेखनाच्या माध्यमातून जागृती : २६ मार्च ते १ एप्रिल २०१८ या सप्ताहात ‘राष्ट्र आणि धर्म’ यांच्याशी संबंधित १३ विषयांवर २१ मराठी नियतकालिकांना पत्रे पाठवण्यात आली. यांपैकी ५१ मराठी पत्रे प्रसिद्ध झाली. १० इंग्रजी दैनिकांनाही पत्रे पाठवण्यात आली. पत्रलेखन सेवेत सर्वश्री राहुल पाटेकर, राहुल लोखंडे, जगन घाणेकर, तसेच जयेश राणे यांनी सहभाग घेतला. मराठी पत्राचे इंग्रजीत अनुवाद करण्याची सेवा सौ. ललिता गोडबोले यांनी केली.

५ आ. वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्रात सहभाग : २६.३.२०१८ या दिवशी ‘जय महाराष्ट्र’ या वृत्तवाहिनीवरील ‘एल्गार मोर्चा’, तसेच ‘पू. भिडेगुरुजी यांच्यावरील आरोप’ या संदर्भातील चर्चासत्रांत हिंदु जनजागृती समितीचे राज्य प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे सहभागी झाले.

५ इ. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने रथयात्रेचे स्वागत! : ‘राष्ट्र निर्माण ट्रस्ट’चे राष्ट्रीय अध्यक्ष सुरेश चव्हाणके यांच्या ‘जनसंख्या नियंत्रण कायदा होण्यासाठी भारत वाचवा’ या महारथ यात्रेचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने मुंबईत ११ ठिकाणी स्वागत करण्यात आले.

५ ई. हनुमानजयंती निमित्त प्रवचनाच्या माध्यमातून जागृती : भांडुप पश्‍चिम येथील ‘अष्टविनायक मित्रमंडळ’ आणि ‘साईबाबा मित्रमंडळ’ येथे ‘हनुमान जयंतीच्या मागील शास्त्र’ हा विषय धर्मप्रेमी श्री. सचिन घाग यांनी मांडला.’

– श्री. सागर चोपदार, मुंबई जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती. (एप्रिल २०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now