सीमेवर दगडफेक करणार्‍या सहस्रो पॅलेस्टाईन लोकांवर इस्रायल सैन्याचा गोळीबार; ५५ जण ठार

जेरुसलेम येथील अमेरिकेच्या दूतावासाचा विरोध

दगडफेक करणार्‍यांना कसे रोखायचे, हे भारत इस्रायलकडून शिकेल का ?

जेरुसलेम – अमेरिकेने जेरुसलेम येथे १४ मे या दिवशी तिचा दूतावास उघडला आहे. त्याला पॅलेस्टाईनच्या सहस्रावधी लोकांकडून गाझा सीमेवर विरोध करण्यात आला. त्यांनी इस्रायलच्या सैन्यावर दगडफेक करून सीमा पार करण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी इस्रायली सैन्याने केलेल्या गोळीबारात ५५ आंदोलक ठार झाले. तत्पूर्वी अश्रूधुराच्या नळकांड्या फोडण्यात आल्या होत्या. अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांनी जेरुसलेमला इस्रायलच्या राजधानीला अधिकृत मान्यता दिल्यानंतर हे दूतावास उघडण्यात आले. अमेरिकेच्या या निर्णयाचा पॅलेस्टाईनने विरोध केला होता.