भुसावळ येथील हिंदु धर्मजागृती सभेनंतर टी. राजासिंह आणि आयोजक यांच्यावर गुन्हा नोंद !

कथित धार्मिक तेढ निर्माण केल्याचा पोलिसांचा दावा !

ही हिंदूंची गळचेपी नव्हे का ? अन्य पंथीय नेते किंवा धर्मगुरु यांच्याकडून धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केली जात असतांना पोलीस काय करतात ?

भुसावळ – येथील टी.व्ही. टॉवर मैदानात १३ मे या दिवशी हिंदु जनजागृती समितीने  आयोजित केलेली ‘हिंदु धर्मजागृती सभा’ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या सभेला संबोधित करणारे भाग्यनगर येथील प्रखर हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनी धार्मिक तेढ निर्माण करणारी वक्तव्ये केल्याचा आरोप करत त्यांच्यासह सभेचे आयोजक सर्वश्री उमेश जोशी, भूषण महाजन आदींवर भारतीय दंडविधानाच्या १५३ (अ), २९५ (अ), १८८ आणि ३४ या कलमांखाली गुन्हा नोंद केला असल्याचे वृत्त स्थानिक वृत्तपत्रांतून प्रसिद्ध झाले आहे. बाजारपेठ पोलीस ठाण्याचे हवालदार छोटू माणिकराव वैद्य हे फिर्यादी असून साहाय्यक पोलीस अधीक्षक निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली बाजारपेठ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चंद्रकांत सरोदे हे पुढील तपास करत आहेत.