‘इव्हीएम्’ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास भाजपला काय अडचण आहे ? – काँग्रेस

  • हा प्रश्‍न काँग्रेसने कर्नाटकमधील निवडणुकीच्या पूर्वी का विचारला नाही ?
  • देशात सत्तेत असतांना काँग्रेसने ‘इव्हीएम्’ऐवजी मतपत्रिकेद्वारे मतदान का घेतले नाही ?, याचे उत्तर प्रथम दिले पाहिजे ! तेव्हाही विरोधी पक्षांनी हीच मागणी केली होती, हे काँग्रेस कशी विसरली ?
  • ‘इव्हीएम्’ यंत्रात घोळ करून निकाल पालटले जातात, अशी शंका जर सर्वच राजकीय पक्षांना आहे, तर ते यावर एकत्रित येऊन निर्णय का घेत नाहीत ?

बेंगळुरू – मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, देशातील एकही राजकीय पक्ष असा नाही की, ज्यांनी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्राविषयी (‘इव्हीएम्’विषयी) शंका उपस्थित केली. भाजपनेही एकेकाळी ‘इव्हीएम्’ला विरोध केला होता. ‘आता देशातील सर्वच पक्ष ‘इव्हीएम्’च्या विरोधात असतांना भाजपला मतपत्रिकेद्वारे मतदान घेण्यास काय अडचण आहे ?’, असा प्रश्‍न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहन प्रकाश यांनी कर्नाटकातील काँग्रेसच्या पराभवानंतर उपस्थित केला आहे.

भाजपने मतपत्रिकेचा वापर करावा ! – उद्धव ठाकरे

मुंबई – पोटनिवडणुका झाल्या की, भाजपचा पराभव होतो आणि निवडणुकांमध्ये भाजप सर्वांत मोठा पक्ष म्हणून उदयास येतो. यामुळे शंकेला जागा उरतेच. भाजपने निवडणुकीच्या वेळी मतपत्रिकेचा वापर करून जनतेच्या मनातील शंका दूर करावी, अशी प्रतिक्रिया शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी व्यक्त केली आहे.