आगामी लोकसभा निवडणुकीच्या काळात भारतात आतंकवादी आक्रमणे करण्याचा आतंकवाद्यांचा कट उघड

भारतातील आणखी किती निवडणुका आतंकवादाच्या सावटाखाली होणार ? पुढील लोकसभा निवडणूक शांततापूर्ण वातावरणात पार पाडायची असेल, तर सरकारने आतंकवाद्यांचा निःपात करणे आवश्यक !

मिर्झा फैजल खान

मुंबई – वर्ष २०१९ मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीत घातपात घडवून आणण्यासाठी पाकिस्तानात आतंकवाद्यांनी ‘ट्रेनिंग कॅम्प’ चालू केले आहे. मुंबई, गुजरात आणि उत्तरप्रदेश येथे आतंकवादी आक्रमणे करण्याची सिद्धता या आतंकवाद्यांनी चालू केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. त्यामुळे या तिन्ही राज्यांना सतर्क रहाण्याची चेतावणी देण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात अटक केलेल्या आणि पाकमध्ये आतंकवादी प्रशिक्षण घेतलेल्या मिर्झा फैजल खानने ही माहिती आतंकवादविरोधी पथकाला दिली. तो ‘युनायटेड जिहाद कौन्सिल’ या आतंकवादी संघटनेत होता. ही संघटना अन्य आतंकवादी संघटनांना भारतात आतंकवादी कारवाया करण्यासाठी साहाय्य करते.

मुंबईत मिर्झा याने अनेक ठिकाणांची रेकी केली होती. महाराष्ट्रातील मोठ्या नेत्यांची हत्या करण्यास त्याला सांगण्यात आले होते. मिर्झासहित भारतात पाठवण्यात आलेल्या अतिरेक्यांना शस्त्रसाठा न मिळाल्याने त्यांना भारतात आक्रमण करता आले नाही. या अतिरेक्यांना नेपाळमार्गे हत्यारे पाठवण्यात आली होती; मात्र हा शस्त्रसाठा हाती लागण्यापूर्वीच मिर्झाला आतंकवादविरोधी पथकाने कह्यात घेतले. वर्ष १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटानंतर पसार झालेल्या फारूख देवाडीवालासाठी मिर्झा काम करत होता. या बॉम्बस्फोटाच्या कटाशी संबंधित आरोपी सलीम कुर्लासाठीही तो काम करत होता.

दुबईतून नैरोबीला जाण्यासाठी मिर्झा याचे तिकीट असूनही तो कराचीला उतरला होता. आयएस्आयने त्याला कराचीत १५ दिवस शस्त्र चालवण्यापासून ते बॉम्ब बनवण्यापर्यंत सर्व प्रशिक्षण दिले होते. त्याच्या अटकेनंतर त्याच्या संघटनेचे सदस्य असलेले अन्य आतंकवादी पसार झाले आहेत.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now