बांगलादेशातील रोहिंग्या मुसलमान शरणार्थींच्या जन्मदरामध्ये प्रचंड वाढ ! – संयुक्त राष्ट्र

बांगलादेशी घुसखोरांमुळे जी परिस्थिती भारतात निर्माण होत आहे, तीच आता बांगलादेशमध्ये रोहिंग्यांमुळे होत आहे. आता बांगलादेशला भारताला होणार्‍या त्रासाची आणि देशाच्या सुरक्षेची जाणीव होईल !

न्यूयॉर्क – बांगलादेशातील शरणार्थी रोहिंग्या मुसलमानांच्या जन्मदरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. तसेच कथित बलात्कारामुळे गरोदर राहिलेल्या सहस्रो महिलांना आरोग्य सुविधा पुरवणे कठीण झाले आहे, असे संयुक्त राष्ट्रांच्या वृत्तसंकेतस्थळाने प्रसिद्ध केलेल्या वृत्तात म्हटले आहे. (रोहिंग्या मुसलमानांची काळजी करणारे संयुक्त राष्ट्र हे काश्मीरमध्ये ३ दशकांपूर्वी हिंदूंना धर्मांधांनी पलायन करण्यास भाग पाडले आणि हिंदु महिलांवर बलात्कार केले, त्या वेळी झोपले होते का ? – संपादक)

संयुक्त राष्ट्रांच्या एका अधिकार्‍याने सांगितले की, अनुमाने ४० सहस्र महिला गरोदर आहेत. यातील काही जण काही आठवड्यातच बाळंत होणार आहेत. यातील बहुसंख्य महिलांवर म्यानमारचे सैन्य आणि तेथील लोकांनी बलात्कार केलेले आहेत, असा दावा त्याने केला.