इंडोनेशियामध्ये इस्लामिक स्टेटकडून आणखी एक बॉम्बस्फोट

‘शांतताप्रेमी’ म्हणून ओळखले जाणारे इस्लामी राष्ट्रही जिहादी आतंकवादाच्या विळख्यात !

सुरबाया (इंडोनेशिया) – इंडोनेशियामध्ये २४ घंट्यांच्या आत आणखी एक आत्मघाती आक्रमण झाले. येथील पोलीस मुख्यालयाजवळ दुचाकीवरून आलेल्या दोघांनी आत्मघाती स्फोट घडवला. यात एका आतंकवाद्याचा मृत्यू झाला, तर स्फोटामध्ये १० जण घायाळ झाले. या आक्रमणाचे दायित्व इस्लामिक स्टेटने स्वीकारले आहे. इंडोनेशियात १३ मे या दिवशी आतंकवाद्यांनी ३ चर्चवर आक्रमणे केली होती. त्यात १३ जणांचा मृत्यू, तर ४१ जण घायाळ झाले होते. (भारतात चर्चवर एक दगड जरी कोणी भिरकावला, तर आकांडतांडव करणारे इंडोनेशियातील चर्चवर झालेल्या आक्रमणाविषयी गप्प का ? – संपादक) पोलीस मुख्यालयावरील आक्रमणावर इंडोनेशियाचे राष्ट्राध्यक्ष म्हणाले की, इस्लामिक स्टेटच्या विरोधात लढा देण्यासाठी पुढील मासात संसदेत सुधारित आतंकवादविरोधी कायदा मांडला जाईल. हा कायदा संमत झाल्यानंतर त्यांच्या विरोधात कठोर कारवाई करता येईल.