भाजप आणि संघ कार्यकर्ते विवाह करत नाहीत; म्हणून बलात्कार करतात ! – काँग्रेस

राहुल गांधीही हेच करतात का ? – भाजपचे प्रत्युत्तर

बलात्कारासारख्या गंभीर आणि संवेदनशील घटनांवर अशा प्रकारचे बालीश आरोप-प्रत्यारोप करणारे राजकीय पक्ष कधीतरी कायद्याचे राज्य देऊ शकतील का ?

भोपाळ – महिलांवरील अत्याचारामध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. प्रतिदिन बलात्काराच्या घटना ऐकायला मिळत आहेत. बलात्काराच्या वाढत्या घटनांमध्ये मध्यप्रदेशचा तिसरा क्रमांक लागतो. (मध्यप्रदेशात भाजपचे राज्य असतांना हे अपेक्षित नाही ! – संपादक) मध्यप्रदेशमध्ये जेवढ्या बलात्काराच्या घटना होत आहेत, त्यामध्ये भाजप आणि रा.स्व. संघ यांच्या कार्यकर्त्यांचा सहभाग आहे. मी आरोप करतो की, संघाचे लोक विवाह करत नाहीत, त्यामुळे अशा प्रकारच्या घटना घडवतात, असे वक्तव्य काँग्रेसचे मध्यप्रदेशातील प्रसारमाध्यम प्रभारी (कार्यभार बघणारे) मानक अग्रवाल यांनी केले आहे. त्यांच्या या विधानावर भाजपचे प्रदेश महासचिव विष्णुदत्त शर्मा यांनी प्रतिक्रिया म्हणून ‘काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनीही विवाह केलेला नाही. तेही असेच काम करतात का ?’, असा प्रश्‍न विचारला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now