अधिक मासाच्या निमित्ताने धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या आश्रमांना अन्नदान करून पुण्यसंचयासह आध्यात्मिक लाभही मिळवा !

सर्वत्रच्या अर्पणदात्यांना अन्नदान करण्याची सुसंधी !

‘१६.५.२०१८ ते १३.६.२०१८ या काळात ‘अधिक मास’ (मलमास) आहे. ३ वर्षांनी एकदा येणार्‍या या मासात नाम, सत्संग, सत्सेवा, त्याग, दान आदींना अधिक महत्त्व असतेे. या मासात दान केल्यास अधिक पटींनी फळ मिळत असल्याने अनेक जण अन्नदान, वस्त्रदान आणि ज्ञानदान करतात. दान हे पापनाशक असून ते पुण्यबळाची प्राप्ती करून देते.

१. अन्नदानाचे अनन्यसाधारण महत्त्व !

‘अन्नदान करणे’, हे श्रेष्ठ कर्म मानले जाते. हिंदु धर्मशास्त्रानुसार जो गृहस्थ अर्थार्जन करतो आणि ज्याच्या घरी प्रतिदिन अन्न शिजते, त्याने अन्नदान करणे, हे त्याचे कर्तव्यच आहे. ‘सद्भावनेने ‘सत्पात्रे अन्नदान’ केल्यास अन्नदात्याला त्याचे उचित फळ मिळते, तसेच सर्व पातकांतून त्याचा उद्धार होऊन तो ईश्‍वराच्या जवळ जातो’, असे धर्मशास्त्र सांगते. आध्यात्मिकदृष्ट्या उन्नत व्यक्तींसाठी अन्नदान केल्यास अन्नदात्याला आध्यात्मिक स्तरावरही लाभ होतो.

२. धर्मप्रसाराचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या आश्रमांना अन्नदान करा !

सनातन संस्था राष्ट्ररक्षण आणि धर्मजागृती यांसाठी कटीबद्ध आहे. भारतात विविध ठिकाणी संस्थेचे आश्रम आणि सेवाकेंद्रे असून तेथे धर्मप्रसाराचे कार्य केले जाते. ‘सध्याच्या काळात राष्ट्र आणि धर्म यांची सेवा करणे अत्यावश्यक आहे’, हे लक्षात घेऊन शेकडो तरुण साधक आश्रमांत राहून पूर्णकालीन सेवा करत आहेत. आश्रमात धर्मप्रसारार्थ शिबिरे, कार्यशाळा आदी उपक्रम वर्षभर चालू असतात आणि या निमित्ताने विविध क्षेत्रांतील अनेक मान्यवरही येत असतात. अशा प्रकारे धर्मजागृतीचे कार्य अव्याहतपणे करणार्‍या सनातनच्या आश्रमांना अन्नदानासाठी धनरूपात साहाय्य करण्याची संधी अर्पणदात्यांना आहे.

३. सनातनच्या सर्व आश्रमांतील साधकांकरता अल्पाहार आणि भोजन यांसाठी येणारा व्यय

जे अर्पणदाते अधिक मासाच्या निमित्ताने साधकांसाठी अल्पाहार (न्याहारी) आणि भोजन यांकरता धनरूपात साहाय्य करून धर्मकार्यात सहभागी होऊ इच्छितात, त्यांनी खालील क्रमांकावर संपर्क साधावा.

नाव आणि संपर्क क्रमांक

सौ. भाग्यश्री सावंत – ७०५८८८५६१०

संगणकीय पत्ता : [email protected]

टपालाचा पत्ता : सौ. भाग्यश्री सावंत, द्वारा ‘सनातन आश्रम’, २४/बी, रामनाथी, बांदिवडे, फोंडा, गोवा. पिन – ४०३४०१’

https://www.sanatan.org/en/donate येथेही दान (अर्पण) करण्याची सुविधा उपलब्ध आहे.’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now