पूर्वनियोजित दंगल !

संपादकीय

संभाजीनगर येथे ११ मे या दिवशी झालेल्या भीषण दंगलीमुळे पुन्हा एकदा सर्वांची झोप उडाली. या दंगलीत ५०० हून अधिक वाहने, तर २०० हून अधिक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. २ जणांचा मृत्यू, तर ३० ते ४० जण घायाळ झाले आहेत. १० हून अधिक पोलीसही घायाळ झाले असून एक कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी गंभीररित्या घायाळ झाल्यामुळे ते अतीदक्षता विभागात उपचार घेत आहेत. पोलिसांच्या तीन गाड्याही दंगलखोरांनी पेटवल्या आहेत. सर्वसामान्य नागरिकांच्या घरादारांचीही मोठी हानी झाली आहे. काही हिंदु महिलांनाही जमावाकडून मारहाण झाली.

अतिशय क्षुल्लक कारणांवरून चालू झालेली ही दंगल एवढ्या मोठ्या प्रमाणावर भडकेल, याची कुणाला कल्पनाही आली नाही. त्याचे कारण म्हणजे ही दंगल पूर्वनियोजित होती. दंगलीची कारणे वेगवेगळी सांगितली जातात. ‘सार्वजनिक नळावर पाणी भरण्यासाठी गेलेल्या एका गृहिणीची धर्मांधांनी छेड काढल्यामुळे त्याविषयी जाब विचारल्याच्या रागातून मोठ्या संख्येने धर्मांध आले आणि दंगलीला प्रारंभ झाला’, असे काही जण सांगतात. काहींच्या मते व्यापार्‍यांच्या दुकानांसमोर धर्मांध हातगाड्या लावतात, त्या काढण्यासाठी स्थानिक नगरसेविकेचे वडील लच्छु पहिलवान यांच्याकडे व्यापार्‍यांनी दाद मागितली. श्री. पहिलवान यांनी महापालिकेला याविषयी पत्र दिल्यामुळे धर्मांधांचा रोष होता. त्यातून दंगल भडकली. आणखी एक कारण असे सांगितले जाते की, स्थानिक धर्मांध फळविक्रेत्याकडून घेतलेले आंबे खराब निघाल्याने त्याविषयी विचारणा करण्यास गेलेल्या मुलांना धर्मांधांकडून मारहाण झाली आणि गाड्या हटवण्याची मागणी झाल्यामुळे दंगल उसळली.

धर्मांधांकडून गृहयुद्धाची सिद्धताच !

ही सर्व कारणे जरी पाहिली, तरी ती किती क्षुल्लक आहेत आणि त्या तुलनेत ‘धर्मांधांकडून घडवण्यात आलेली दंगल किती भीषण होती’, हे लक्षात येते. प्रत्यक्षदर्शींच्या सांगण्यानुसार काही सहस्रांहून अधिक धर्मांधांनी ३ ट्रॉली भरून दगड, पेट्रोलची गाडी, पेट्रोल बॉम्ब आणि सुतळी बॉम्ब आक्रमण करण्यासाठी आणले होते. निजामुद्दीन चौकातील विजेच्या ट्रान्सफॉर्मरला आग लावण्यात आली, रस्त्यावरील विजेचे दिवे फोडून नंतर जाळपोळ आणि धुडगूस घालण्यात आला. हे सर्व ऐकले, तरी ही एखाद्या गृहयुद्धाची सिद्धताच म्हणावी लागेल; कारण वाहिन्यांवर जेव्हा दंगलीच्या नंतरची स्थिती दाखवण्यात आली, तेव्हा रस्त्याच्या कामासाठी त्यावर भराव टाकावा, एवढा दगडांचा खच ठिकठिकाणी पडलेला दिसत होता.

वृत्तवाहिन्यांनी वार्तांकन करतांना अनेक महत्त्वाच्या गोष्टींकडे दुर्लक्ष केल्याचे दिसते. त्यामध्ये एक म्हणजे संस्थान गणपति मंदिरावरील आक्रमण ! या आक्रमणात मंदिराच्या एका भागाची हानी झाली; मात्र हे कोणत्याही वृत्तवाहिनीने दाखवले नाही. ही नि:पक्षपाती पत्रकारिता आहे का ?

एमआयएमकडून दंगलखोरांना पाठराखण !

दंगलीच्या दुसर्‍याच दिवशीच एमआयएमचे ओवैसी यांनी या दंगलीच्या प्रकरणी स्थानिक शिवसेना कार्यकर्त्यांच्या चौकशीची मागणी केली; मात्र संभाजीनगरचा पूर्वेतिहास पडताळला असता, शिवसेनेचे नव्हे, तर एमआयएमचे नेते आणि कार्यकर्ते हेच विखारी भाषणे देतांना चलचित्रे  पहावयास मिळतात. त्यातूनच येथील वातावरण कलुषित झाले आहे. एमआयएमचे आमदार इम्तियाज जलील तर कोणत्याही प्रकरणात ‘पोलिसांनाही बघून घेऊ’ अशा भूमिकेतून येथे वावरत असतात. याविषयी ओवैसी काही बोलले नाहीत. ज्या तत्परतेने त्यांनी शिवसेना कार्यकर्त्यांच्या चौकशीची मागणी केली, त्यावरून त्यांचाही या दंगलीला मूक पाठिंबा होता का, याचे अन्वेषण झाले पाहिजे.

‘जेथे धर्मांध बहुसंख्य असतात, तेथे या दंगली घडवल्या जातात’, असा आजवरचा अनुभव आहे. महाराष्ट्रात मागील काही वर्षांमध्ये अचलपूर, धुळे, राबोडी इत्यादी भागांमध्ये दंगली झाल्या. धुळे येथील दंगलीनंतर त्या भागात हिंदुत्वनिष्ठांचे पाहणी पथक गेले असता तेथील मूळ हिंदु घरमालकांच्या घरांचा ताबा धर्मांधांनी मिळवल्याचे लक्षात आले. हिंदूंच्या जागा धर्मांधांनी त्यांच्या नावावर करून घेतल्याची कागदपत्रेही या वेळी मिळाली होती. काही निमित्त साधून हिंदूंच्या वस्त्यांवर आक्रमणे करायची, संपत्तीची नासधूस करायची, हिंदु स्त्रियांची विटंबना करायची आणि हिंदूंनी भयामुळे तेथून पळ काढला की, हिंदूंची मालमत्ता कह्यात घ्यायची हे तंत्र धर्मांध काश्मीरपासून केरळपर्यंत अवलंबत आले आहेत. मागील काही शतकांमध्ये हिंदुबहुल भारतावर बाहेरून धर्मांध मोगलांची आक्रमणे व्हायचे आणि ते प्रदेश कह्यात घ्यायचे. आता काळ पालटला आहे; मात्र देशातील धर्मांधांची मूळ प्रवृत्ती काही पालटत नाही.

आजवर झालेल्या दंगलींमध्ये धर्मांधांना शिक्षा होण्याचे प्रमाण अगदी नगण्य आहे. परिणामी धर्मांधांचे मनोधैर्य उंचावले आहे. ‘संभाजीनगर येथे दंगल उसळल्यावर बराच वेळ पोलीस आले नाहीत’, असे स्थानिक लोकप्रतिनिधींनी सांगितले. अशा वेळी पोलीसही कारवाई करण्यास कचरतात, तर सर्वसामान्य नागरिकांची काय कथा ? तेथील कुंभारवाडा भागात नागरिकांमध्ये अद्यापही भीतीचे वातावरण आहे. शिवसेनाप्रमुख कै. बाळासाहेब ठाकरे यांनी त्यांच्या काळात आणि आता राज ठाकरे यांनीही धर्मांधांकडून देशभर दंगली घडवल्या जाण्याचे भाकीत केले होते. तेच आता सत्यात उतरत आहेत. कै. बाळासाहेब ठाकरे यांनी ‘या दंगलींच्या वेळी शिवसैनिक हिंदूंचे रक्षण करतील’, असे आश्‍वासन दिले होते. त्याचीही प्रचीती संभाजीनगर येथील दंगलींच्या वेळी आली; मात्र सर्वसामान्य हिंदूंचे काय ? हिंदू आताच संघटित झाले नाहीत, तर उद्या एकत्र रहाण्यासही शिल्लक रहाणार नाहीत, हेच खरे. तात्पर्य ‘सङ्घे शक्तिः कलौ युगे ।’ हे लक्षात घ्यावे.