चौकात ठिकठिकाणी वाढदिवसानिमित्त राजकारण्यांची अथवा श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी मृत व्यक्तींची ‘होर्डिंग्ज’ लावण्यापेक्षा देवता, साधू-संत वा क्रांतीकारक यांची ‘होर्डिंग्ज’ लावणे श्रेयस्कर !

‘२ -३ मासांपूर्वी आमच्या गावातील एका प्रसिद्ध चौकात सहज दिसेल, अशा ठिकाणी एक मोठे ‘होर्डिंग’ लावण्यात आले. त्या ‘होर्डिंग’वर एका त्रासदायक व्यक्तीचे मोठ्या आकारातील छायाचित्र लावले आहे. ते ‘होर्डिंग’भर चौकात असल्याने माझे त्याकडे लक्ष गेले. तेव्हा आधी मला काही जाणवले नाही. नंतर मला महत्त्वाचे काम करतांना आणि झोपतांनाही ‘होर्डिंग’वरील व्यक्तीचा तोंडवळा आठवू लागला आणि त्रास होऊ लागला. असे मला पुष्कळ दिवसांपासून होत आहे. ‘त्या ‘होर्डिंग’कडे पहायचे नाही’, असे मी कितीही ठरवले, तरी तिकडे लक्ष जाते आणि मग तोच तोंडवळा आठवत रहातो. यावर उपाय म्हणून मी तो तोंडवळा आठवला की ‘परात्पर गुरु डॉक्टरांचे फेटा घातलेले छायाचित्र आठवायचे’, असे ठरवले; परंतु तरीही मला तो तोंडवळा आठवतोच.

यावरून ‘शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध आणि शक्ती यांचे व्यक्तीवर कसे परिणाम होतात’, ते लक्षात येते. ते चित्र भर चौकात असल्यामुळे येणारे – जाणारे अनेक जण ते पहातात. त्या व्यक्तींवरही त्याचे अनिष्ट परिणाम होत असतील; परंतु ते त्यांच्या लक्षात येत नसतील. त्यामुळे ठिकठिकाणी वाढदिवसानिमित्त लावली जाणारी राजकारण्यांची ‘होर्डिंग’ अथवा मृत व्यक्तींच्या श्रद्धांजलींची ‘होर्डिंग’ न लावणे हेच चांगले; कारण त्यामुळे त्यांतून बाहेर पडणार्‍या स्पंदनांचा समाजाला त्रास होऊ शकतोे. यापेक्षा देवता, संत वा क्रांतीकारक यांचे ‘होर्डिंग’ लावले, तर त्याचा सामान्य जनांवर चांगला परिणाम होतो.’

– एक साधिका

(‘सध्या सर्वत्रच मार्गामार्गात अशी होर्डिंग्ज लावलेली आढळतात. त्यांतून येणार्‍या स्पंदनांचा वरीलप्रमाणेच सर्वांनाच त्रास होत असतो. ती हटवण्याची सुबुद्धी राजकारणी आणि अनुमती देणारे संबंधित प्रशासकीय अधिकारी यांना होईल तो सुदिन ! हिंदु राष्ट्रात मात्र समाजातील सात्त्विकता न्यून करणारी अशी होर्डिंग्ज न लावता समाजात सात्त्विकता पसरवणारी किंवा समाजाला आदर्शवत असणार्‍या व्यक्तींची चित्रे लावलेली असतील.’ – संकलक)