मुंबईत प्लास्टिकच्या बाटल्यांची विल्हेवाटीसाठी ५०० यंत्र लावणार !

मुंबई – येथे नियमित ३८ लाख बाटल्यांचा उपयोग होतो. एवढ्या प्लास्टिक बाटल्यांची विल्हेवाट लावणे मुंबई महानगरपालिकेसाठी डोकेदुखी ठरत आहे. त्यामुळे या बाटल्यांची विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेने ५०० ‘बॉटल क्रशिंग यंत्र’ बसवण्याचा निर्णय घेतला आहे. याचा प्रारंभ महापालिकेकडूनच चालू करण्यात आला असून पहिली २ यंत्रे महापालिकेच्या मुख्यालयात बसवण्यात आली आहेत.

उच्च न्यायालयाने प्लास्टिक बंदीच्या निर्णयाला स्थगिती देण्यास नकार दिल्यानंतर महापालिकेने प्लास्टिक बंदीच्या प्रभावी कार्यवाहीसाठी कृती आराखडा सिद्ध केला आहे. यासह प्लास्टिकचा उपयोग बंद करण्यास नागरिकांना प्रोत्साहित करण्यासाठी नामवंत व्यक्ती, वलयांकीत व्यक्ती यांद्वारे जनजागृती करण्यात येणार आहे. प्लास्टिक जमा करण्याची केंद्रे वाढवण्याचा पालिकेचा विचार आहे.


Multi Language |Offline reading | PDF