महिलांवरील अत्याचारांची मोदी यांनी गंभीर नोंद घ्यावी ! – आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड

वर्ष १९८९ मध्ये काश्मीरमधील हिंदूंना त्यांच्या ‘बायका घरात ठेवून निघून जा’, असे मशिदींवरील भोंग्यांवरून सांगण्यात आले होते. त्यानंतर शेकडो महिलांवर अत्याचार झाले, तेव्हा आंतरराष्ट्रीय स्तरावर कोणीही याची नोंद घेतलेली नव्हती. प्रतिदिन हिंदू मुलींना ‘लव्ह जिहाद’च्या जाळ्यात ओढून त्यांचा उपभोग घेतला जातो, याविषयी कोणी बोलत नाही; मात्र आता कठुआ प्रकरणावरून हिंदूंना लक्ष्य करण्याचा सर्वच स्तरांवरून प्रयत्न होत आहे, हे हिंदूंनी लक्षात घेतले पाहिजे !

IMF chief Christine Lagarde said PM Modi needs to pay more attention to women

न्यूयॉर्क – भारतात (कठुआ प्रकरणात) जे घडले, ते खरंच बीभत्स होते. मला आशा आहे की, भारतातील प्रशासन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व घटनांकडे गांभीर्याने बघतील. भारतातील महिलांना सुरक्षेची आवश्यकता आहे, असे आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या प्रमुख क्रिस्तिना लगार्ड यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना म्हटले आहे. ‘हे माझे वैयक्तिक मत असून आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचे नाही’, असेही त्यांनी आवर्जून स्पष्ट केले आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now