कर्नाटकातील काँग्रेस सरकारमधील ऊर्जामंत्री शिवकुमार यांची संपत्ती ५ वर्षांत ५८९ कोटी रुपयांनी वाढली

बुद्धीच्या पलीकडे वाटणारी संपत्ती वाढ भ्रष्टाचाराविना होऊच शकत नाही, असे जनतेला वाटल्यास चुकीचे काय ? अशी संपत्ती शासनाधीन (जप्त) करून शिवकुमार यांची चौकशी करण्याचे धाडस केंद्र सरकार करील का ?

बेंगळुरू – कर्नाटक विधानसभेच्या निवडणुकीसाठी काँग्रेसने विद्यमान ऊर्जामंत्री डी.के. शिवकुमार यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. शिवकुमार यांनी उमेदवारीचे आवेदन प्रविष्ट केले आहे. आवेदनासह जोडलेल्या प्रतिज्ञापत्रामुळे त्यांची संपत्ती ५ वर्षांत ५८९ कोटी रुपयांनी वाढल्याचे उघड झाले आहे. शिवकुमार यांची संपत्ती वर्ष २०१३ मध्ये २५१ कोटी होती, ती आता ८४० कोटी रुपये झाली आहे. म्हणजेच त्यांची संपत्ती ५८९ कोटी रुपयांनी वाढली आहे. शिवकुमार यांच्याकडे वर्ष २००८ मध्ये ७५ कोटी रुपयांची संपत्ती होती. १० वर्षांत त्यांची संपत्ती इतकी कशी काय वाढली ?, असा प्रश्‍न जनतेकडून विचारला जात आहे.

काही मासांपूर्वी राज्यसभेच्या निवडणुकीत काँग्रेसचे उमेदवार अहमद पटेल यांचा पराभव होऊ नये; म्हणून काँग्रेसच्या खासदारांची शिवकुमार यांच्या कर्नाटकातील आलिशान ‘रिसॉर्ट’मध्ये सोय करण्यात आली होती. त्यानंतर शिवकुमार यांचे घर आणि  कार्यालय यांवर धाड घालण्यात आली होती. या वेळी त्यांच्याकडून ३०० कोटी रुपयांची बेहिशोबी मालमत्ता शासनाधीन (जप्त) करण्यात आल्याचे सांगितले जात होते. शिवकुमार यांची संपत्ती वाढण्यामागे येथील भूमींचे वाढलेले भाव हे महत्त्वाचे कारण आहे, असे त्यांच्या समर्थकांचे म्हणणे आहे.


Multi Language |Offline reading | PDF