भारतीय सैन्यातील काश्मीरमधील इद्रीस मीर नावाचा सैनिक हिजबुल मुजाहिदीनमध्ये सहभागी

भारतीय सैन्यात भरती झालेले काश्मीरमधील तरुण असा राष्ट्रद्रोह करत असतील, तर ते देशासाठी धोकादायक आहे !

श्रीनगर – दक्षिण काश्मीरमधून गेल्या आठवड्यापासून बेपत्ता असलेला भारतीय सैनिक इद्रीस मीर आतंकवादी संघटना हिजबुल मुजाहिदीनमध्ये सामील झाला आहे. मीर ३ वर्षांपासून सैन्याच्या ‘जम्मू-काश्मीर लाइट इन्फंट्री’त होता. झारखंडमध्ये तैनात केल्याच्या कारणावरून तो अप्रसन्न असल्याचे सांगण्यात येते. मीर या मासाच्या प्रारंभी सुटीवर शोपियांमध्ये आला होता. तो गेल्या आठवड्यापासून बेपत्ता होता. मीरने दोघा स्थानिक व्यक्तींसमवेत हिजबुलमध्ये प्रवेश केला. ते संबंधित दोघेही बेपत्ता होते.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now