बंदूक हे समस्येचे उत्तर नाही !

जनरल बिपीन रावत यांचे काश्मिरी तरुणांना आवाहन

काश्मीरमधील तरुण केवळ बंदूक हातात घेतात, असे नाही, तर ते दगडफेकही करतात आणि त्यासाठी त्यांना भडकावले जाते अन् पैसेही दिले जातात. हे रोखण्यासाठी भारत सरकार आणि सैन्य काय प्रयत्न करत आहे, हे रावत यांनी सांगायला हवे !

श्रीनगर – बंदूक हे कोणत्याही समस्येचे उत्तर नाही, याची जाणीव काश्मिरी तरुणांना लवकरच होईल, असे प्रतिपादन सैन्यदल प्रमुख जनरल बिपीन रावत यांनी केले. जम्मू-काश्मीर लाइट इन्फट्रीच्या ७० व्या स्थापनादिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमात रावत बोलत होते. काश्मीरमधील परिस्थिती बिघडलेली नाही. येथील फक्त वातावरण बिघडले आहे. स्थानिकांच्या साहाय्याने आम्ही खोर्‍यात शांतता प्रस्थापित करू, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्त केला. त्यांनी काश्मिरी तरुणांनी आतंकवादाचा मार्ग सोडण्याचे आवाहन केले. (काश्मीरमध्ये सैनिकांवर दगडफेक केली जाते. त्यांना आतंकवाद्यांच्या विरोधात कारवाई करतांना रोखण्याचा प्रयत्न केला जातो. हे स्थानिक लोक असतात. त्यांच्यावर सैन्य काय कारवाई करते, हे रावत यांनी सांगायला हवे ! – संपादक)
जनरल रावत म्हणाले की, ३ दशकांपासून धुमसत असलेल्या काश्मीरमध्ये शांतता प्रस्थापित करणे हाच एक समस्या सोडवण्याचा मार्ग आहे. (३ दशके ही समस्या सुटली नाही, ती आता कशी सोडवणार, हे रावत सांगतील का ? – संपादक) सैन्य किंवा आतंकवादी काश्मीरची समस्या सोडवू शकणार नाहीत. त्यासाठी तरुणांनीच पुढाकार घेण्याची आवश्यकता आहे. काही तरुणांची माथी भडकावून त्यांना आतंकवादाच्या मार्गावर नेण्यात येत आहे; मात्र तो समस्येवरील उपाय नाही. त्याने काहीही साध्य होणार नाही.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now