‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’च्या पावडरमुळे कर्करोग झाल्याने ७६० कोटी रुपयांची हानीभरपाई देण्याचा न्यायालयाचा आदेश

वॉशिंग्टन – ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ची पावडर वापरल्याने कर्करोग होत असल्याच्या एका प्रकरणात न्यायालयाने संबंधिताला ७६० कोटी रुपयांची हानीभरपाई देण्याचा आदेश आस्थापनाला दिला आहे. अशा प्रकारच्या या सातव्या खटल्यामध्ये या आस्थापनाला हानीभरपाई द्यावी लागत आहे. गेल्या २ वर्षांत या आस्थापनाला ६ प्रकरणांत ५ सहस्र ९५० कोटी रुपयांची हानीभरपाई द्यावी लागली आहे.

न्यूजर्सी येथे रहाणारे स्टीफन लेंजो यांना ‘मेसोथेलियोमा’ हा आजार झाला आहे. हा एक प्रकारचा कर्करोगच असून तो शरिरातील पेशी, फुफ्फुसे, पोट, हृदय आणि अन्य भाग हळूहळू प्रभावित करत जातो. ‘जॉन्सन अ‍ॅण्ड जॉन्सन’ आस्थापनाची पावडर गेली ३० वर्षे आपण वापरत आहे. या पावडरमध्ये असलेल्या एका घटकामुळे हा कर्करोग झाल्याचा दावा त्यांनी केला होता.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now