धुळे येथील जुगलकिशोर गिंदोडिया ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

त्यागी वृत्तीचे आणि श्रीकृष्णावर श्रद्धा असलेले धुळे येथील श्री. जुगलकिशोर बन्सीलाल गिंदोडिया (वय ७६ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त !

श्री. जुगलकिशोर गिंदोडिया (उजवीकडे) यांचा सत्कार करतांना सद्गुरु नंदकुमार जाधव

धुळे – धुळे येथील धर्माभिमानी श्री. जुगलकिशोर गिंदोडिया ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झाले आहेत. त्यांच्या घरी जाऊन सनातनचे सद्गुरु नंदकुमार जाधव यांनी त्यांचा श्रीकृष्णाची प्रतिमा भेट देऊन सत्कार केला. या वेळी सनातनचे साधक आणि त्यांचे कुटुंबीय उपस्थित होते.

२५ डिसेंबरला धुळे येथे झालेल्या धर्मजागृती सभेला धर्माभिमानी श्री. जुगलकिशोर गिंदोडिया यांनी स्वमालकीचे पटांगण उपलब्ध करून दिले होते. सभेनंतर ते म्हणाले, ‘‘धर्मजागृती सभेमुळे मैदान शुद्ध झाले आहे. तुम्हाला कधीही लागले, तर वापरू शकता.’’

१. ‘जुगलकिशोर काकांची राहणी साधी आहे. ते खादीचे कपडे घालतात.’ – श्री. पंकज बागुल, धुळे

२. ‘बाबा स्वतःची कामे स्वतः करतात.

३. कितीही अडचणी आल्या, तरी ते सकारात्मक असतात. ते पूर्ण अभ्यास करून कृतीचे नियोजन करतात.

४. आमचे एकत्र कुटुंब आहे. ते सर्वांशी समभावाने वागतात.’

– श्री. विश्‍वेश गिंदोडिया (मुलगा), धुळे

५. देवाची ओढ : ‘त्यांनी ३० वर्षांपूर्वी श्री बालाजी रथोत्सव चालू केला. ‘आता अधिकाधिक लोक यात सहभागी होत आहेत’, याचे त्यांना समाधान आहे.

६. त्यागी वृत्ती : ते आम्हाला सांगतात, ‘‘धर्मजागृती सभेसाठी माझे मैदान केव्हाही विनामूल्य उपलब्ध होईल. माझ्याकडून अजूनही काही साहाय्य लागल्यास मी करीन.’’ सभेसाठी त्यांचे मैदान उपलब्ध होण्याविषयी विचारले असता गुरुमाऊलीच्या कृपेने त्यांनी एका मिनिटात सही करून मैदान विनामूल्य उपलब्ध करून दिले. त्या मैदानाचे एक दिवसाचे भाडे १ लक्ष रुपये आहे.

७. अल्प अहं : ते धुळे शहरातील धनवान व्यक्ती आहेत; पण त्याचा त्यांना गर्व नाही. ते सर्वांशी नम्रतेने बोलतात.

८. सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्याप्रती आपुलकी : आमचा श्री. मुन्नाशेठ अग्रवाल यांच्याशी संपर्क झाला असता ते म्हणाले, ‘‘काका कुणालाही मैदान विनामूल्य देत नाहीत. समिती आणि संस्था यांच्याबद्दल त्यांना विश्‍वास आहे; म्हणून त्यांनी तुम्हाला मैदान विनामूल्य उपलब्ध करून दिले.’’

– श्री. पंकज बागुल

९. श्रद्धा

अ. ‘त्यांची ज्योतिर्लिंग, जगन्नाथ पुरी आणि भगवान बालाजी यांच्यावर श्रद्धा आहे.’ – श्री. विश्‍वेश गिंदोडिया

आ. ‘सभेसाठी मैदान देऊ नये’, यासाठी पोलिसांनी त्यांच्यावर दबाव आणला, तरीही त्यांनी सभेसाठी मैदान दिले. त्यांनी साधकांना सांगितले, ‘‘पोलिसांना घाबरू नका. श्रीकृष्णापेक्षा कुणीही मोठे नाही.’’

१०. कृतज्ञताभाव : सभा यशस्वी झाल्यावर ते म्हणाले, ‘‘श्रीकृष्ण आणि गुरुमाऊली यांच्या कृपेने झाले.’’ हे सांगतांना त्यांच्या डोळ्यांत अश्रू आले.’

– श्री. पंकज बागुल (मार्च २०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now