पाकिस्तानने भारतीय शीख तीर्थयात्रेकरूंना दूतावास अधिकार्‍यांशी भेटण्यापासून रोखले

  • कोणत्याही माध्यमातून भारताला त्रास देणारा पाक !
  • अशा घटनांच्या वेळी भारतातील पाकप्रेमी तोंड का उघडत नाहीत ?

नवी देहली – भारतीय दूतावासातील अधिकार्‍यांना भारतातून पाकिस्तानमध्ये पोहोचलेल्या शीख तीर्थयात्रेकरूंना भेटण्यास मनाई केली आहे, तसेच या यात्रेकरूंसह असणारी एक बैठकही घेण्यास पाकने विरोध केला. यावर भारताने आक्षेप घेतला आहे. पाकमधील रावळपिंडी येथील पंजा साहिब गुरुद्वाराच्या दर्शनासाठी १ सहस्र ८०० यात्रेकरू गेले आहेत.

परराष्ट्र मंत्रालयाने सांगितले की, ही एक सामान्य प्रक्रिया असते. भारतीय अधिकार्‍यांना भारतातून येणार्‍या शीख यात्रेकरूंना भेटण्याची आणि त्यांच्या तीर्थस्थानी जाण्याची सवलत असते. राजशिष्टाचाराच्या नियमांतर्गत ही सवलत दिली जाते. याचा उद्देश कोणत्याही स्वरूपाच्या आपत्काळात एकमेकांना साहाय्य करण्याचा असतो.