कर्नाटकातील काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांची क्षमायाचना !

योगी आदित्यनाथ कर्नाटकात आल्यास त्यांना चपलेने मारण्याविषयी केले होते विधान

सर्वाधिक काळ देशावर राज्य करणार्‍या काँग्रेसची पापे पाहिली, तर काँग्रेसवाल्यांविषयीही जनतेला असेच वाटल्यास चुकीचे ते काय ! 

दिनेश गुंडू राव

बेंगळुरू – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ जर राज्यात (कर्नाटकमध्ये) आले, तर त्यांना चपला दाखवून झोडपून काढले पाहिजे. ते राजकारणातील कलंक आहेत. त्यांची मुख्यमंत्रीपदावर बसण्याचीही लायकी नाही. त्यांच्यामध्ये जरासुद्धा लाज असेल, तर त्यांनी तात्काळ पदाचे त्यागपत्र द्यावे, असे संतापजनक विधान करणारे काँग्रेसचे कर्नाटक राज्य कार्यकारी अध्यक्ष दिनेश गुंडू राव यांनी त्यांच्या या विधानावर क्षमा मागितली आहे. बलात्कार पीडितांच्या वेदना आणि योगी आदित्यनाथ सरकारचा निष्काळजीपणा पाहून मी भावनांमध्ये वहात गेलो आणि अशी विधाने केली. जर माझ्या विधानांमुळे कोणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी क्षमायाचना करतो; (गुंडू राव यांनी क्षमा मागतांनाही जर-तरची भाषा केली आहे, हे लक्षात घ्या ! – संपादक) मात्र उत्तरप्रदेशातील कायदा आणि सुव्यवस्था अत्यंत गंभीर आहे, असेही गुंडु राव यांनी क्षमा मागतांना म्हटले. काँग्रेसकडून कठुआ आणि उन्नाव बलात्कार प्रकरणात येथे आयोजित मेणबत्ती मोर्च्यात गुंडू राव यांनी आक्षेपार्ह विधान केले होते. (राज्यात भाजप आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्या, त्या रोखू न शकणारे काँग्रेसचे सरकार तरी लायक आहे का ? त्यांच्यात लाज आहे, तर ते त्यागपत्र का देत नाही ? – संपादक) भाजपने राव यांच्या या विधानाला आक्षेप घेऊन त्यांनी क्षमा मागावी, अशी मागणी केली होती.

गुंडू राव यांनी ‘ट्विटर’द्वारे टीका करतांना लिहिले होते की, योगी यांचा इतिहास गुन्हेगारी स्वरूपाचा आहे. त्यांच्यासारख्या अनेक योगी आणि कथित संतांचीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी आहे. त्यामुळे आपण आताही त्यांना योगी म्हणून संबोधायला हवे का ? योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखील उत्तरप्रदेशात रामराज्य नाही, तर रावण राज्य चालू आहे. त्याचे नेतृत्व भोगी आदित्यनाथ करत आहेत. राज्याच्या जनतेप्रती योगी पूर्णपणे नापास झाले आहेत. योगींसमवेत भाजप कर्नाटक आणि भारतातील संतांचा अपमान करत आहे. (एका योगीचा असा उल्लेख करून त्यांचा अवमान करणार्‍या गुंडू राव यांची यातून लायकी दिसून आली ! काँग्रेसने देशावर सर्वाधिक काळ राज्य केले, ते रामराज्य होते का ? भारताच्या फाळणीला काँग्रेस उत्तरदायी आहे, त्या वेळी १० लाख हिंदूंची हत्या झाली आणि लक्षावधी हिंदू महिलांवर बलात्कार झाले, हे गुंडू राव का सांगत नाहीत ? काश्मीरमधील साडेचार लाख हिंदूंना विस्थापित होण्याला आणि शेकडो हिंदू महिलांवरील बलात्काराला तत्कालीन काँग्रेसच उत्तरदायी आहे, हे राव यांना माहिती नाही का ? भोपाळ येथे वायूगळतीमुळे सहस्रो लोकांचा मृत्यू झाला होता, त्याला उत्तरदायी असणार्‍या ‘युनियन कार्बाईड’च्या मालकाला भारतातून पळून जाऊ देणारी काँग्रेस होती, हे गुंडू राव का सांगत नाहीत ? हिंदूंच्या योगीवर टीका करणारे काँग्रेसवाले जिहादी आतंकवादी लादेनचा मात्र ‘ओसामाजी’ असा उल्लेख करतात, हे लक्षात घ्या ! अशा काँग्रेसला योगी आदित्यनाथ यांच्यावर टीका करण्याचा नैतिक अधिकार आहे का ?- संपादक)

सिद्धरामय्या सरकारच्या काळात राज्यात ३ सहस्र ८५७ बलात्कार झाले आहेत, तर सिद्धरामय्या आणि गुंडू राव यांना चपलेने झोडपायचे का ? – भाजपचा प्रश्‍न

गुंडू राव यांच्या टीकेनंतर भाजपही आक्रमक झाला होता. ‘राज्यातील सिद्धरामय्या यांच्या शासन काळात आतापर्यंत ३ सहस्र ८५७ बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. जर गुंडू राव चपलांनी मारण्याची भाषा करत असतील, तर याच न्यायाने सिद्धरामय्या आणि त्यांना चपलांनी मारायचे का ? काँग्रेसने योगी आदित्यनाथ यांच्याविषयी बोलतांना तोंड संभाळून बोलले पाहिजे. ते नाथ संप्रदायाचे संत आहेत. कर्नाटकात त्यांना मानणारे लक्षावधी लोक आहेत आणि ते काँग्रेसला क्षमा करणार नाहीत’, असे भाजपने म्हटले होते.

भाजप नेते बी.एस्. येडीयुरप्पा म्हणाले होते की, गुंडू राव यांच्या वक्तव्यामुळे संपूर्ण नाथ संप्रदायचा, तसेच मुख्यमंत्रीपदाचा अपमान झाला आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now