अयोध्येमध्ये राममंदिर होणारच ! – आलोक कुमार, नूतन कार्याध्यक्ष, विहिंप

आलोक कुमार, नूतन कार्याध्यक्ष, विहिंप

गुरुग्राम (हरियाणा) – अयोध्येत राममंदिर व्हावे, अशी कोणा एकाची इच्छा नाही, तर कोट्यवधी हिंदूंची इच्छा आहे. त्यांचेच प्रतिनिधित्व विश्‍व हिंदु परिषद करत आहे. त्यामुळे अयोध्येत राममंदिर निर्माण होणारच, असे प्रतिपादन विहिंपचे नूतन कार्याध्यक्ष अधिवक्ता आलोक कुमार यांनी केले. एका मुलाखतीत त्यांनी वरील प्रतिपादन केले. आलोक कुमार संघ स्वयंसेवक आहेत आणि त्यांनी विहिंपसाठी अनेक खटले लढवले आहेत.