जम्मू-काश्मीरमधील वाढत्या गुन्हेगारीला ‘पीडीपी’ आणि भाजप उत्तरदायी !

मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांच्या पर्यटनमंत्री असलेल्या भावाचीच टीका

श्रीनगर – ‘पीपल्स डेमॉक्रॉटिक पार्टी’ (पीडीपी) आणि भाजप यांनी एकत्र येत जम्मू-काश्मीरमध्ये सरकार स्थापन केले. तेव्हापासून राज्यातील गुन्हेगारी वाढली आहे. या वाढत्या गुन्हेगारीतही ‘पीडीपी’ आणि भाजप हे दोन पक्ष भागीदार आहेत. त्यांच्या या भागीदारीचे मूल्य काश्मीरच्या नागरिकांना त्यांच्या रक्ताने मोजावे लागत आहे, असा आरोप जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबूबा मुफ्ती यांचे बंधू तसादुक मुफ्ती यांनी केला आहे. तसादुक मुफ्ती हे मुफ्ती सरकारमध्ये पर्यटनमंत्री आहेत. भाजपसह युती केल्यानंतर आम्ही एकप्रकारच्या तणावाखाली आहोत, असेही त्यांनी म्हटले आहे.