जम्मू-काश्मीरमध्ये पोलिसांनी गोवंश  तस्करीचे ४ ठिकाणचे प्रयत्न उधळले

३ धर्मांधांना अटक, तर २ पसार

गोतस्करांना पकडू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांना कधी पकडू शकतील का ?

गोहत्याबंदी कायदा अस्तित्वात असतांना एवढ्या मोठ्या संख्येने गोतस्करी होणे सरकारसाठी लज्जास्पद ! यावरून गोहत्याबंदी कायद्याची कार्यवाहीच होत नसल्याचे उघड होते ! याला उत्तरदायी असणार्‍यांना सरकारने कारागृहात पाठवले पाहिजे !

श्रीनगर – जम्मू-काश्मीर राज्यात पोलिसांनी गोवंश तस्करीचे ४ ठिकाणचे प्रयत्न उधळून लावले. यात ३ धर्मांधांना अटक करण्यात आली, तर २ जण पसार झाले. पोलिसांनी एकूण ३८ गोवंश वाचवले. या प्रकरणी पोलिसांनी तिघा धर्मांधांना अटक केली असून दोघांनी पोबारा केला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांचे एक पथक सांबा जिल्ह्यातील तापयाल येथील महामार्गावर पडताळणी करत होते. त्या वेळी तेथे आलेल्या एका ट्रकला पोलिसांनी थांबण्याची सूचना केली. तथापि पोलिसांना पाहून ट्रकचालकाने ट्रक दुसर्‍या दिशेने नेण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी ट्रकचा पाठलाग करून ट्रक पकडला; मात्र चालकाने ट्रक तेथेच सोडून पळ काढला. त्या वाहनात १३ गोवंश कोंबले होते. पोलिसांनी त्यांना मुक्त केले.

दुसर्‍या घटनेत पोलिसांच्या पथकाने नोनाथ महामार्गावर पकडलेल्या एका ट्रकमध्ये ११ गोवंश आढूळन आले. या ट्रकचा चालकही फरार झाला. पोलिसांनी हा ट्रक जप्त केला असून ते चालकाचा शोध घेत आहेत.

तिसर्‍या घटनेत पोलिसांनी जम्मू जिल्ह्यातील जज्जरकोटली परिसरात एक ट्रक पकडून त्यातील १२ गोवंश वाचवले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा नोंद केला असून ट्रकचालक जफर हुसेन यास अटक केली आहे.

चौथ्या घटनेत पोलिसांनी जम्मू जिल्ह्यातील बहिशनाह परिसरात एका वाहनातून २ गोवंशांची सुटका केली. या प्रकरणीही पोलिसांनी वाहनचालक सुबशेद दीन, तसेच त्याचा साथीदार जुनैद यांना अटक केली आहे.


Multi Language |Offline reading | PDF