हत्येसाठी प्राण्याच्या खरेदी विक्रीवरील बंदी केंद्र सरकारने उठवली !

स्वतःच्या निर्णयांवर ठाम न रहाणारे सरकार काय कामाचे ?

नवी देहली – देशात पशू खरेदी-विक्री बाजारांमधील पशूंच्या हत्येसाठी खरेदी-विक्री करण्यावर केंद्र सरकारने घातलेली बंदी आता उठवण्यात आली आहे. सर्व पक्षांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे आता गायीसह सर्व प्राण्यांची या बाजारात खरेदी-विक्री होऊन त्यांची हत्या केली जाऊ शकणार आहे.

गेल्या वर्षी २३ मे २०१७ मध्ये सरकारने ही बंदी घातली होती. याचा देशभरातून विरोध झाला होता. तसेच सर्वोच्च न्यायालयानेही याला स्थगिती दिली होती. आता केलेल्या पालटामध्ये पशूंची हत्या करतांना केली जाणारी क्रूरता थांबवण्याचे नियम घालण्यात आले आहेत. तसेच या बाजारात तरुण आणि आजारी नसलेल्या प्राण्यांचीही विक्री केली जाऊ शकणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF