इस्रोच्या आयआर्एन्एस्एस्-१II या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

भारतीय शास्त्रज्ञ जगभरात भारताचे नाव उज्ज्वल करतात, तर स्वार्थी राजकारणी घोटाळे आणि अन्य गुन्हेगारी कृत्ये करून देशाचे नाव जगभरात कलंकित करतात !

श्रीहरिकोटा (आंध्रप्रदेश) – भारतीय अवकाश संशोधन संस्था म्हणजे इस्रोने १२ एप्रिलच्या पहाटे आयआर्एन्एस्एस्-१III या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. श्रीहरिकोटा या ठिकाणी असलेल्या सतीश धवन अवकाश तळावरून हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आला. अवकाशात भारताच्या दिशादर्शनच्या ७ उपग्रहांची एक साखळी आहे. हा उपग्रह अवकाश कक्षेत स्थिर झाल्यानंतर या उपग्रहांच्या समूहामध्ये दाखल होईल. मागच्या वर्षी ऑगस्ट २०१७ मध्ये आयआर्एन्एस्एस्-१ एच् उपग्रहाचे प्रक्षेपण अखेरच्या टप्प्यात अयशस्वी ठरले होते. आता प्रक्षेपित केलेल्या उपग्रहामुळे मासेमारांना समुद्रात जाण्याआधी वातावरणाची योग्य माहिती मिळेल. त्यामुळे मासेमारांना दिशादर्शक असा हा उपग्रह ठरणार आहे.


Multi Language |Offline reading | PDF