पाकिस्तानी हिंदूंची जागरूकता !

पाकिस्तानचे माजी क्रिकेटपटू आणि राजकारणी इम्रान खान यांचे भगवान शंकराच्या रूपातील छायाचित्र पाकिस्तानच्या सामाजिक माध्यमांतून मोठ्या प्रमाणात प्रसारित झाले. या चित्रामुळे पाकिस्तानात मोठ्या प्रमाणावर गदारोळ झाला. विशेषत: तेथील हिंदूंनी याविरुद्ध आवाज उठवला. पाकिस्तान पीपल्स पार्टी’चे रमेश लाल यांनी हे प्रकरण अत्यंत गंभीर असून कोणत्याही धर्मियांच्या भावना दुखावणे संविधानाच्या विरुद्ध आहे. गृहमंत्री तलाल चौधरी यांना तातडीने अहवाल देण्यास सांगण्यात आले आहे.’ स्थानिक हिंदूंनी आम्ही पाकिस्तानी असलो, तरी सर्वप्रथम हिंदू आहोत’, असे खरमरीत प्रतिपादन सामाजिक माध्यमांवर केले आहे. स्वत:च्या श्रद्धास्थानांच्या अवमानाविरुद्ध एवढी जागरूकता पाकिस्तानमध्ये प्रथमच पहायला मिळाली.

पाकमधील हिंदूंवर अत्याचार होतात, त्यांचे अपहरण होते, हिंदु स्त्रियांवर अत्याचार होतात इत्यादी बातम्या पाकिस्तानातून प्रतिदिन ऐकण्यास मिळतात. त्यामुळे पाकमध्ये हिंदू औषधालाही शेष नाहीत’, असेच वाटत होते. त्या पार्श्‍वभूमीवर भगवान शंकराचे विडंबन रोखण्यासाठी हिंदूंनी पाकच्या संसदेपर्यंत आवाज उठवणे निश्‍चितच आशादायी आहे. धर्मो रक्षति रक्षितः ।’, असे संस्कृत वचन आहे. त्याचा अर्थ धर्माचे रक्षण जो करतो, त्याचे धर्म (म्हणजे भगवंत) रक्षण करतो’, असा आहे. पाकिस्तानी हिंदूंनी देवता, श्रद्धास्थाने यांच्या अवमानाच्या विरोधात वैध मार्गाने असाच लढा चालू ठेवल्यास त्यांच्याकडून धर्मरक्षण होईल आणि पर्यायाने त्यांचेही रक्षण होईल. पाकिस्तानमधील सामाजिक, राजकीय स्थिती हिंदूंच्या मुळावर उठणारी आहे. तेथे भारताच्या स्वातंत्र्याच्या वेळी असलेली २३ प्रतिशत हिंदूंची लोकसंख्या आता केवळ २ प्रतिशत राहिली आहे. हिंदूंची हत्याकांडे, धर्मांतर, लव्ह जिहाद इत्यादींमुळे हिंदूंची लोकसंख्या न्यून होत गेली. कडवे इस्लामी राष्ट्र असलेले आणि आता आतंकवाद्यांचा अड्डा बनलेला पाक मुसलमान सोडून इतरांना जीवंत राहू देईल का ?

पाकच्या हिंदूंकडे कोट्यवधी हिंदू रहात असलेला भारत लक्ष देत नाही. तसेच मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटना त्यांना साहाय्य करत नाहीत. अशा वेळी तेथील अल्पसंख्य हिंदूंना स्वत:च्या पायावर उभे राहून अस्तित्वासाठी लढा द्यावा लागत आहे. पाकिस्तानातील हिंदूंनी त्यांच्या लढ्याला धर्माच्या अधिष्ठानाची जोड दिल्यास त्यांच्या प्रयत्नांची नोंद घेतली जाईल, तसेच त्यांना यशही मिळेल. काही वर्षांपूर्वी क्रिकेटपटू महेंद्रसिंह धोनी यांचे छायाचित्र वापरून भगवान विष्णूचे विडंबन करण्यात आले होते. या घटनेनंतर त्याची आवठण झाली. एका प्रथितयश नियतकालिकाने त्याच्या मुखपृष्ठावर  भगवान विष्णूच्या रूपात धोनी यांना दाखवल्यावर त्याविरुद्ध केवळ एका जागरूक हिंदूने पोलीस ठाण्यात तक्रार केली. न्यायालयात खटला प्रविष्ट करण्याच्या पलीकडे याला विशेष विरोध झाला नाही. धर्माप्रती भारतीय हिंदूंची उदासीनता ही ख्रिस्ती, धर्मांध आणि हिंदुविरोधक यांच्या पथ्यावर पडत आहे. भारतातील हिंदूंनी आता पाक येथील हिंदूंकडून शिकावे’, असे म्हणण्याची वेळ येऊ नये, हीच अपेक्षा आहे.

म्यानमार येथील हिंदूंची दुःस्थिती ?

मध्यंतरी म्यानमारमध्ये रोहिंग्या मुसलमान आणि म्यानमारचे सैन्य यांमध्ये मोठी धुमश्‍चक्री झाली. यामध्ये अनेक रोहिंग्या मुसलमान मारले गेले. म्यानमार येथील रोहिंग्यांचा कळवळा जगाला आला; मात्र तेथील एक महत्त्वाचे भीषण वृत्त वाहिन्यांनी उघड केल्यावर रोहिंग्या मुसलमानांवरील कारवाई आवश्यकच होती’, हे लक्षात आले. रोहिंग्यांनी राखीन प्रांतात स्थानिक शेकडो हिंदूंची हत्याकांडे घडवून आणली, तसेच शेकडो हिंदु महिलांवर सामूहिक बलात्कार करून त्यांचे मृतदेह जंगलात टाकून दिले. म्यानमारच्या सैन्याने कारवाई केल्यामुळे रोहिंग्या मुसलमानांनी त्यांच्या देशातून अन्यत्र पलायन केले. यांपैकी काहींनी बांगलादेश सरकारच्या वतीने विस्थापितांसाठी उभारलेल्या निवार्‍यात आश्रय घेतला होता. रोहिंग्या मुसलमानांनी म्यानमार येथील हिंदूंची हत्याकांडे घडवतांना पुरुषांना ठार केले, तर हिंंदु स्त्रियांना स्वत: समवेत घेऊन बांगलादेशात आश्रय घेतला.

बांगलादेशातील विस्थापित छावण्यांमध्येही हिंदु महिलांची परवड थांबलेली नाही. येथे हिंदु स्त्रियांच्या माथ्यावरील कुंकू पुसण्यात आले, बांगड्या तोडण्यात आल्या, त्यांना बुरखा घालायला भाग पाडण्यात आले. त्यांची ही व्यथा त्यांनी वृत्तवाहिन्यांवर बोलून दाखवली होती. त्या असाहाय्य असल्याने त्यांनी म्यानमार आणि भारत सरकार यांच्याकडे साहाय्य मागितले आहे. यांपैकी काही महिलांची सुटका करण्यात म्यानमारला यश आले आहे. या घटनेवरून आंतरराष्ट्रीय स्तरावर हिंदूंची दु:स्थिती अधोरेखित होते. भारतासारख्या बहुसंख्य हिंदूंच्या देशातच हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या, लव्ह जिहादद्वारे हिंदु महिलांची विटंबना, धर्मांतर सरकार रोखू शकत नाही. हिंदु सणांवरच बंधने लादण्यात येतात, तर न्यायालयीन आदेशसुद्धा हिंदूंसाठीच लागू असतात. काश्मीर, कैराना, कच्छ इत्यादी भागांमधून हिंदूंना पलायन करावे लागते. परिणामी स्वत:च्याच देशात बलहीन झालेला हिंदू अन्य देशांतील धर्मबांधवांच्या साहाय्याला जाण्याची सुतराम शक्यता नाही. हिंदूंमधील दुर्बलता दूर करण्यासाठी शौर्य जागरणाची आवश्यकता आहे. हिंदूंचे तेजस्वी राष्ट्र नसल्याने शौर्य जागरणाची परंपरा खंडित झाली आहे. बलशाली राष्ट्र घडवल्यास हिंदूंमध्ये पुन्हा वीरता जागृत होऊन तो धर्मबांधवांचे रक्षण करू शकेल. त्यामुळे हिंदु राष्ट्राची स्थापना अपरिहार्य आहे !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now