बांगलादेशने सरकारी नोकर्‍यांंमधील आरक्षण हटवले !

विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण यांच्या आंदोलनाचा परिणाम

भारतापेक्षा लहान असणार्‍या इस्लामबहुल देशात आरक्षण हटवले जाऊ शकते, तर भारतासारख्या पुढारलेल्या देशात ते का होऊ शकत नाही ? भारतातही आरक्षण हटवण्यासाठी विद्यार्थी आणि बेराजगार तरुण यांनी वैध मार्गाने आवाज उठवला पाहिजे !

आरक्षण योजनेच्या विरोधात सहस्रो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुण

ढाका – बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी ‘सरकारी नोकर्‍यांमधील आरक्षण हटवणार’, असे घोषित केले आहे. विशेष गटांसाठी सरकारी नोकर्‍यांंमध्ये असलेल्या आरक्षण योजनेच्या विरोधात सहस्रो विद्यार्थी आणि बेरोजगार तरुणांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले होते. शेख हसीना यांनी घेतलेला हा निर्णय त्यांच्या आंदोलनाचा विजय मानला जात आहे.

१. शेख हसीना यांच्या कार्यकाळात बांगलादेशमध्ये झालेले हे आतापर्यंतचे सर्वांत मोठे आंदोलन होते. बांगलादेशमध्ये आतापर्यंत इतक्या मोठ्या प्रमाणात लोकांनी एकत्र येऊन आंदोलन झाले नव्हते. ढाका येथील रस्त्यावर सहस्रोंच्या संख्येने लोकांनी जमा होऊन आरक्षण रहित करण्याची मागणी केली होती. या वेळी पोलिसांनी केलेल्या कारवाईत अनेकजण घायाळही झाले होते.

२. सरकारच्या आरक्षण योजनेनुसार सार्वजनिक विभागातील ५६ टक्के नोकर्‍या स्वातंत्र्यसैनिकांची मुले, महिला, पारंपरिक अल्पसंख्यांक आणि मागासलेल्या जिल्ह्यांमधील लोकांसाठी राखीव होते.

हे आरक्षण १० टक्क्यांवर आणण्याची मागणी आंदोलनकर्ते करत होते, तसेच नोकरीसाठी अर्ज करणार्‍याला आरक्षणाची संधी किंवा अधिकार केवळ एकदाच देण्यात यावा, अशीही त्यांची मागणी होती.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now