फास्ट फूड’मुळे रोगप्रतिकारक शक्ती अल्प होण्याची शक्यता ! – जर्मनीतील बॉन विश्‍वविद्यालया’च्या संशोधनातील निष्कर्ष

फास्ट फूड’चे दुष्परिणाम जाणा ! कुठे मनुष्याला शारीरिकदृष्ट्या सुदृढ बनवण्यासह त्याची वृत्तीही सात्त्विक बनवणारी भारतीय संस्कृतीने सांगितलेली सात्त्विक आहारपद्धत, तर कुठे मनुष्याच्या जिवावर उठलेली आधुनिक आणि विनाशकारी पाश्‍चात्त्य आहारपद्धत !

बर्लिन (जर्मनी) – फास्ट फूड’मुळे रोगप्रतिकारक शक्तीवर परिणाम होऊ शकतो, असा निष्कर्ष बॉन विश्‍वविद्यालया’चे प्रा. ज्योकीम शुल्टज् यांनी केलेल्या संशोधनाअंती काढला. फास्ट फूड’मुळे शरिराचे संरक्षण करणार्‍या यंत्रणेची क्रियाशीलता न्यून होते आणि रोगप्रतिकारक पेशी मोठ्या प्रमाणात वाढतात. त्याचे दूरगामी परिणाम म्हणून मधुमेहासारख्या व्याधी बळावू शकतात, असेही त्यांनी स्पष्ट केले.

१. याविषयी केलेल्या प्रयोगात शास्त्रज्ञांनी एका उंदराला काही मास पाश्‍चात्त्य पद्धतीचे अन्न म्हणजेच फास्ट फूड’ खायला दिले. त्याचा परिणाम म्हणून उंदराच्या शरिरात सर्वत्र सूज आली, तसेच त्याच्या रक्तामधील रोगप्रतिकारक पेशींवरही परिणाम झाला.

२. शास्त्रज्ञांनी नंतर त्या उंदराला सुमारे ४ मास घरगुती पद्धतीचे अन्न खायला दिले. तेव्हा त्या उंदराला आलेली सूज नाहीशी झाली; मात्र मूळ रोगप्रतिकारक पेशी तशाच कार्यरत होत्या.

३. शरिरात संसर्ग वाढल्यानंतर शरिराची प्रतिकारक्षमता अल्प होते. फास्ट फूड’मुळे शरिरात दाहकता निर्माण होते आणि अनुवांशिकतेवरही त्याचा परिणाम होतो.

वरील निष्कर्ष समाजाच्या दृष्टीने फार उपयुक्त आहेत. चुकीच्या आहाराचे आपल्या आरोग्यावर विपरीत परिणाम होऊ शकतात. सध्याच्या शिक्षणपद्धतीमध्ये  निरोगी आहाराविषयी प्राधान्याने शिकवले गेले पाहिजे. त्यामुळे लहान मुले फास्ट फूड’च्या मोहापासून परावृत्त होतील. प्रतिदिन काय खावे ?’, याची निवड लहान मुलांना निश्‍चित करू द्यावी; मात्र योग्य आहाराच्या सवयींविषयी विचारपूर्वक निर्णय घेण्यासाठी त्यांना प्रवृत्त करण्याचे दायित्व पालकांनी स्वीकारले पाहिजे.

(संदर्भ : रेडीफ डॉट कॉम’ संकेतस्थळ)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now