शिया वक्फ बोर्डाच्या अध्यक्षांना ठार करण्याची दाऊद इब्राहिमची सुपारी

राममंदिराचे समर्थन केल्याचा परिणाम !

देहली – अयोध्येत राममंदिर व्हावे, याचे समर्थन करणारे उत्तरप्रदेश शिया वक्फ बोर्डाचे अध्यक्ष वसीम रिझवी यांची हत्या करण्यासाठी आंतरराष्ट्रीय जिहादी आतंकवादी दाऊद इब्राहिम याने सुपारी दिल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी देहली पोलिसांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीतील ३ गुंडांना उत्तरप्रदेशमधील बुलंद शहरातून अटक केली आहे. या तिघांनी दाऊदच्या सांगण्यावरून वसीम यांच्या हत्येचा कट रचला होता.

देहली पोलिसांनी दाऊद इब्राहिमच्या टोळीतील अटक केलेले ३ गुंड

१. वसीम रिझवी यांना जानेवारीमध्ये धमक्यांचे दूरभाष आले होते. दूरभाषवरून बोलणार्‍या व्यक्तीने त्यांना ठार मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी रिझवी यांनी पोलिसांकडे तक्रार प्रविष्ट केली होती.

२. ‘वसीम यांची हत्या करून देशात दंगल पसरवण्याचा त्यांचा कट होता’, असे वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी सांगितले. या तिघांची कसून चौकशी चालू आहे.

३. वसीम रिझवी यांनी ‘अयोध्येत राममंदिर बांधावे आणि मशीद लक्ष्मणपुरी येथे बांधावी’, असा तोडगा त्यांनी सुचवला होता. या तोडग्यावर काही मुसलमान नेते अप्रसन्न होते.


Multi Language |Offline reading | PDF