मंदिरात बलात्कार होणे शक्यच नाही ! – जम्मू उच्च न्यायालय बार कौन्सिलचे अध्यक्ष अधिवक्ता बी.एस्. सलाठीया

कठुआ (जम्मू) येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराचे प्रकरण

जम्मू उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता बी.एस्. सलाठीया

जम्मू – कठुआमधील अल्पवयीन मुलीवरील बलात्काराच्या प्रकरणी जम्मू-काश्मीर पोलिसांनी केलेल्या चौकशीला आक्षेप घेऊन ११ एप्रिल या दिवशी जम्मू बंद पाळण्यात आला. या बंदची घोषणा जम्मू उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता संघटनेने (बार कौन्सिल) दिली होती. कठुआ बलात्कार आणि हत्या प्रकरणाची चौकशी केंद्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (‘सीबीआय’कडे) सोपवण्यात यावी आणि जम्मूतील रोहिंग्या मुसलमानांना तेथून हाकलण्यात यावे, अशा मागण्या अधिवक्ता संघटनेने केल्या आहेत. (रोहिंग्यांना हाकलण्याची मागणी का करावी लागते ? सरकारच्या हे लक्षात का येत नाही ? – संपादक) जम्मू उच्च न्यायालयाच्या अधिवक्ता संघटनेचे अध्यक्ष अधिवक्ता बी.एस्. सलाठीया यांनी ‘रेडीफ डॉट कॉम’ या वृत्तसंकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत ‘बलात्काराचे प्रकरण मंदिरात झालेलेच नाही’, असा दावा केला आहे.

अधिवक्ता बी.एस्. सलाठीया यांच्या मुलाखतीमधील काही संक्षिप्त अंश

१. कठुआ येथील बलात्कार आणि हत्या प्रकरणात बळी पडलेल्या मुलीस न्याय मिळालाच पाहिजे; मात्र पोलिसांनी घटनेमागील सत्य दडपून या प्रकरणाला जातीय रंग दिला आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी ‘सीबीआय’कडे सोपवण्यात यावी.

२. जम्मूतील अधिवक्ते या प्रकरणातील आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत, असा अपप्रचार एका कटाचाच भाग आहे. आमची मागणी आहे की, या प्रकरणाची चौकशी जम्मू पोलिसांऐवजी काश्मीर येथील पोलिसांनी करावी. जो पोलीस अधिकारी सध्या चौकशी करत आहे, तो एका प्रकरणात एक वर्ष कारागृहात होता.

३. जम्मूतील अधिवक्ते हे पोलीस आणि राजकीय कार्यक्षेत्रात हस्तक्षेप करत नसून आम्ही केवळ न्यायाची भूमिका मांडत आहोत. राजकीय शक्तींनी काश्मीरमध्ये अशांतता पसरवली असून आता ते जम्मूमध्येही तसेच वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

४. आरोपपत्रात असे म्हटले आहे की, जम्मूतील हिंदूंनी आदिवासी अल्पसंख्यांकांविरुद्ध कट रचून त्यांना हाकलून लावण्यासाठी हा बलात्कार घडवून आणला आहे. याचाच अर्थ जम्मूमध्ये जातीय तणाव पसरवण्याचा कट रचला जात आहे. यामुळे दंगली होतील, असे त्यांना वाटते.

५. न्यायाच्या नावाखाली निष्पाप हिंदूंचा बळी जाऊ नये. पोलिसांनी मेरठ येथून २ मुलांना पकडून आणले. त्यांना मारहाण करून खोटे जबाब द्यायला लावले. या मुलांनी न्यायाधीशांसमोरही सांगितले की, त्यांना मारहाण करून खोटे जबाब देण्यास भाग पाडले.

६. हा बलात्कार मंदिरात झाला, हे खरे नाही; कारण कोणताही हिंदु मंदिरात असे घृणास्पद कृत्य करणार नाही, म्हणजेच यात हिंदूंचा हात नाही. हा श्रीनगरवरून आयात केलेल्या पोलीस अधिकार्‍यांनी रचलेला डाव आहे.

…तर जम्मूतील युवक ‘एके ४७’ किंवा बॉम्ब हातात घेतील !

जर राज्य सरकार त्यांच्या मागण्या मान्य करणार नसेल, तर जम्मूमधील तरुण जे आज राष्ट्रध्वज हातात घेऊन आंदोलन करत आहेत, ते उद्या ‘एके ४७ रायफल’ किंवा बॉम्ब हातात घेऊ शकतात, असे विधानही अधिवक्ता सलाठीया यांनी केले.

काय आहे कठुआ येथील बलात्काराचे प्रकरण ?

१. सध्या देशात येथील कठुआ भागात झालेल्या बलात्कार प्रकरणावरून गदारोळ उडाला आहे. तेथील बकरवाल या अल्पसंख्यांक समाजातील ८ वर्षीय मुलीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. तिचे प्रेत १७ जानेवारीला जंगलात आढळून आल्यावर काश्मीर खोरे आणि जम्मूमध्ये आंदोलन पेटले.

२.  हत्या झालेल्या मुलीच्या कुटुंबियांनी मुलीचे अपहरण करून तिला मंदिरात डांबले आणि गुंगीचे औषध देऊन तिच्यावर काही दिवस बलात्कार करून शेवटी तिची हत्या केल्याचा आरोप केला आहे. हिंदूंनी आम्हाला येथून हुसकावून लावण्यासाठी हा प्रकार केल्याचाही त्यांनी आरोप केला आहे.

३. जम्मू पोलिसांनी या प्रकरणी चौकशी करून ७ जणांना अटक केली अन् त्यांच्या विरुद्ध बलात्कार आणि हत्येच्या आरोपाखाली न्यायालयात ९ एप्रिलला आरोपपत्र प्रविष्ट केले. त्या विरोधात हिंदू एकता मंच या संघटनेने आंदोलन पुकारले आहे. या प्रकरणावरून डोगरा समाजाला लक्ष्य केल्याचाही आरोप होत आहे.

४. विशेष तपास पथकाच्या आरोपपत्रानुसार कठुआ परिसरात वास्तव्याला असलेल्या बकरवाल समाजामध्ये भीतीचे वातावरण निर्माण व्हावे आणि त्यांनी परिसर सोडून जावे, या हेतूने एका मंदिराचे प्रमुख असलेल्या सांझीराम याने मुलीच्या अपहरणाचा आणि हत्येचा कट रचला.

५. सांझीराम याच्यासह विशेष पोलीस अधिकारी दीपक खजुरीया, सुरेंद्र वर्मा, प्रवेश कुमार उपाख्य मन्नू, सांझीरामचा मुलगा विशाल जंगरोटा आणि अल्पवयीन पुतण्या यांनाही यांच्यावरही बलात्कार आणि हत्येचा आरोप ठेवण्यात आला आहे. हत्या झाल्याचे उघडकीस आल्यानंतर महत्त्वाचे पुरावे नष्ट केल्यासाठी हवालदार तिलक राज आणि पोलीस उपनिरीक्षक यांनाही आरोपी करण्यात आले आहे.

६. बकरवाल समाजाकडून गोहत्या केली जात असल्याचा संशय सांझीराम आणि इतर गावकर्‍यांना होता. त्यातूनच हा प्रकार करण्यात आल्याचेही म्हटले जात आहे.

बलात्कार पीडितेचे नाव उघड केल्यामुळे कारवाई का करू नये ? – देहली उच्च न्यायालयाची प्रसारमाध्यमांना नोटीस

नवी देहली – कठुआ बलात्काराच्या प्रकरणातील पीडित मुलीची ओळख उघड केल्यावरून देहली उच्च न्यायालयाने प्रसारमाध्यमांना नोटीस बजावली आहे, तसेच यापुढे मुलीची ओळख उघड करण्यात येऊ नये, अशी तंबीही दिली आहे. (‘बलात्कार पीडितेचे नाव प्रसिद्ध करू नये’, असा नियम आहे, हे प्रसारमाध्यमांना माहिती नाही कि त्यांनी जाणीवपूर्वक हिंदूंना लक्ष्य करण्यासाठी ते उघड केले ? तसेच कठुआ प्रकरणात हिंदू आरोपी असल्यावरून त्याला तशी प्रसिद्धी देणारी प्रसारमाध्यमे निर्भयाच्या प्रकरणात किंवा अन्य बलात्काराच्या प्रकरणात अल्पसंख्यांक समाजातील आरोपी असतांना तशी वृत्ते प्रसिद्ध करत नाहीत, हे लक्षात घ्यायला हवे ! – संपादक)

देहली उच्च न्यायालयाच्या कार्यवाहक मुख्य न्यायमूर्ती गीता मित्तल आणि न्यायमूर्ती सी. हरि शंकर यांनी प्रसारमाध्यमांमधून प्रसिद्ध झालेल्या वृत्तावरून त्यांना नोटीस बजावून ‘नाव उघड केल्याप्रकरणी तुमच्यावर कारवाई का करू नये?’, अशी नोटीस बजावून उत्तर मागितले आहे. (प्रसारमाध्यमेच नव्हे, तर चित्रपट क्षेत्रातील अल्पसंख्यांक समाजातील काही जणांनी या मुलीचे नाव ‘ट्वीट’ करून हिंदूंना झोडपण्याचा प्रयत्न केला आहे, अशांवरही न्यायालयाने कारवाई केली पाहिजे ! – संपादक)

कठुआ येथील घटनेमागे पाकिस्तानचा हात ! – नंदकुमार सिंह चौहान, भाजप प्रदेशाध्यक्ष, मध्यप्रदेश

भोपाळ – कठुआ येथील घटनेमागे पाकिस्तानचा हात आहे, असे विधान मध्यप्रदेशचे भाजप प्रदेशाध्यक्ष नंदकुमार सिंह चौहान यांनी केले आहे.

चौहान म्हणाले की, काश्मीरमध्ये मुलीवर बलात्कारानंतर जर ‘जय श्रीराम’च्या घोषणा झाल्या असतील, तर याचा अर्थ हे काम नक्कीच पाकिस्तानी माणसांचे आहे. असे कृत्य करून पाकिस्तानी देशाचे तुकडे करू इच्छित आहेत. काश्मीरमध्ये हिंदूंची संख्या १ टक्काही नाही. त्यातही जे हिंदू तिथे रहातात, ते आधीपासूनच असाहाय्य असून अन्यायाविरोधात मूग गिळून गप्प बसले आहेत. ती माणसे ‘जय श्रीराम’च्या घोषणा कशा देऊ शकतात ? काश्मीरमध्ये जे काही चालू आहे, ते केवळ पाकिस्तानी हस्तकच करू शकतात, असेही त्यांनी म्हटले आहे.

कठुआ बलात्कारप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून बार असोसिएशन्सना  नोटीसा

नवी देहली –  कठुआ येथील बलात्कार प्रकरणात आरोपींवर आरोपपत्र प्रविष्ट करण्यास विरोध केल्याप्रकरणी लिखित तथ्य सादर केले जावे, अशी सूचना सर्वोच्च न्यायालयाने येथील अधिवक्त्यांना केली आहे. न्यायालयाने या संदर्भात जम्मू-काश्मीर उच्च न्यायालय बार असोसिएशन, बार कौन्सिल ऑफ जम्मू-काश्मीर आणि कठुआ जिल्हा बार असोसिएशन यांना नोटीस पाठवली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी १९ एप्रिलला घेण्यात येणार आहे.

(म्हणे) ‘देशात महिलांवर अत्याचार वाढत असून केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत !’ – राहुल गांधी

कठुआ आणि उन्नाव बलात्कारच्या प्रकरणी काँग्रेसचा इंडिया गेटवर मेणबत्ती मोर्चा

काँग्रेसच्या हातात सत्ता असतांना प्रतिदिन महिलांवर बलात्कार होत होते, तेव्हा राहुल गांधी यांनी तोंड उघडले नव्हते. त्यामुळे राहुल गांधी आणि काँग्रेसच्या या नौटंकीला कोणीही भीक घालणार नाही, हे त्यांनी लक्षात घ्यावे !

नवी देहली – कठुआ आणि उन्नाव येथील बलात्काराच्या प्रकरणी काँग्रेसने १२ एप्रिलच्या रात्री देहलीतील इंडिया गेटजवळ मेणबत्ती मोर्चा काढला. यात पक्षाध्यक्ष राहुल गांधी, प्रियांका वडेरा आणि अन्य काँग्रेसी नेत्यांसह कार्यकर्ते सहभागी झाले होते. ‘महिलांवर अत्याचार वाढत असून त्यांच्यासाठी देशात असुरक्षिततेचे वातावरण आहे. हे सूत्र राजकीय नसून राष्ट्रीय समस्या आहेे. यावर केंद्र सरकारने ठोस पावले उचलण्याची आवश्यकता आहे’, असे मत राहुल गांधी यांनी व्यक्त केले. (देहलीतील निर्भया प्रकरणी याच इंडिया गेटवर जनतेने अनेक दिवस आंदोलन केले होते; मात्र तेव्हाच्या काँग्रेस सरकारने त्याला कोणतीही दाद दिली नव्हती आणि शेवटी प्रकरण अधिक चिघळू नये; म्हणून निर्भयाला सिंगापूर येथे उपचारासाठी नेऊन तेथे तिचा मृत्यू होऊ दिला होता, हे जनता विसरलेली नाही. – संपादक)

या मोर्च्याला पोलिसांनी रोखण्याचा प्रयत्न केला. त्या वेळी काँग्रेस नेत्यांनी ‘बॅरिकेट्स’ हटवण्याचा प्रयत्न केला. मोर्चा रोखल्यानंतर प्रियांका वडेरा यांनी राजपथ मार्गावर कार्यकर्त्यांसह धरणे आंदोलन केले. या वेळी गोंधळ निर्माण झाला होता. त्यावर प्रियांका वडेरा यांनी अप्रसन्नता व्यक्त केली. (साधा मोर्चाही शिस्तबद्ध काढू न शकणारे काँग्रेसी ! – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF