(म्हणे) ‘वादग्रस्त विधान केल्याप्रकरणी आमदार टी. राजासिंह यांच्यावर कारवाई करा !’

बीड येथील मुसलमान समाजाची मागणी

किती हिंदू असे आपल्या नेत्यासाठी संघटित होतात ?

बीड – येथे ८ एप्रिल या दिवशी झालेल्या हिंदु धर्मजागृती सभेमध्ये भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी वादग्रस्त विधान केल्याचे कारण पुढे करत ‘त्यांच्या विरोधात गुन्हा नोंद करावा’, अशी मागणी शहरातील मुसलमान समाजाच्या वतीने मोईन मास्टर, फारूख पटेल, शेख शफीक, खुर्शीद आलम यांसह अनेकांनी पोलीस अधीक्षक आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.

त्या निवेदनात म्हटले आहे की, छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगणात (स्टेडियममध्ये) ८ एप्रिलला झालेल्या सभेमध्ये भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी वादग्रस्त सूत्रे उपस्थित करून समाजात जाणीवपूर्वक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला. हिंदु-मुसलमान समाज शांततेत रहात असतांना आमदार टी. राजासिंह यांच्यासारखे लोक समाजात द्वेष पसरवत आहेत. याचा निषेध करत आमदार टी. राजासिंह यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करणार्‍यांवर गुन्हा नोंद करावा.’ (आमदार टी. राजासिंह जे बोलले, ती वस्तूस्थिती असून याचा देशातील हिंदूंना वारंवार अनुभव येत आहे ! – संपादक)

(संदर्भ : दैनिक पार्श्‍वभूमी, बीड)


Multi Language |Offline reading | PDF