(म्हणे) ‘संभाजी भिडेंना रोखा, नाहीतर महाराष्ट्रात कठुआ आणि उन्नाव यांप्रमाणे घटना घडतील !’

तथाकथित समाजसेवक तुषार गांधी यांची पत्रकार परिषदेतून जातीयवाद पसरवणारी चेतावणी !

‘संभाजी भिडेगुरुजी यांना अटक न केल्यास महिलांवर अत्याचार होतील’, असाच अर्थ तुषार गांधी यांच्या विधानांतून होतो. पू. संभाजीराव भिडे यांच्यासारख्या आदरणीय व्यक्तीविषयी अशा प्रकारे विखारी विधाने करून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे, असे जनतेला वाटल्यास चूक ते काय ?

संभाजी भिडेंना रोखा, महाराष्ट्राचा कठुआ- उन्नाव होईल- तुषार गांधी आणि माजी पोलीस अधिकारी शिरीष इनामदार

मुंबई – पश्‍चिम महाराष्ट्रात हिंदु राष्ट्रवादाचा विखारी प्रसार करण्यात आला असून कठुआ (जम्मू) आणि उन्नाव (उत्तरप्रदेश) यांप्रमाणे महाराष्ट्रातही असे (बलात्काराचे) प्रकार घडायला नको असतील, तर आताच सतर्क रहायला हवे. संभाजी भिडेंना रोखा, नाहीतर महाराष्ट्रात कठुआ आणि उन्नाव यांसारख्या घटना घडतील, अशी चेतावणी समाजसेवक तुषार गांधी (मोहनदास गांधी यांचे पणतू) यांनी दिली आहे. ‘कोरेगाव भीमा प्रकरणात संभाजी भिडेंचा काय संबंध होता, याची चौकशी व्हायलाच हवी. मुख्यमंत्री त्यांना कशी काय ‘क्लीन चीट’ देऊ शकतात ? कारवाई राहिली बाजूला, भिडेंसारख्यांना राजकीय वरदहस्त लाभत आहे. सध्या अराजकीय व्यक्तींनी दडपण आणण्याची आवश्यकता आहे’, असे वक्तव्यही गांधी यांनी केले आहे. मुंबई येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जम्मूतील कठुआ आणि उत्तरप्रदेशमधील उन्नाव येथे नुकत्याच बलात्काराच्या घटना घडल्या असून त्या पार्श्‍वभूमीवर तुषार गांधी यांनी वरील विधान केले आहे.

माजी पोलीस अधिकारी शिरीष इनामदार या वेळी म्हणाले, ‘‘महाराष्ट्रासह देशामध्ये विखारी विचारसरणी लोकांच्या मनामध्ये भिनवली जात आहे. ज्या वेळी राजकीय उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अन्य समाजाच्या संदर्भात लोकांच्या मनात विष पेरले जाते, त्या वेळी उन्नाव आणि कठुआ यांसारख्या घटना घडतात. संभाजी भिडे यांची नि:पक्षपाती चौकशी पोलीस यंत्रणांनी करायला हवी आणि त्याचा अहवाल द्यायला हवा. कोरगाव भीमा प्रकरणी दोन-अडीच मासांपासून वातावरण तापवले जाते, सहस्रोंपेक्षा अधिक तरुण जमतात, त्यातील २५० जण दुसर्‍या ठिकाणी रवाना होतात आणि या सगळ्याचा गुप्तचर यंत्रणांना पत्ता असू नये, हे गुप्तचर यंत्रणांचे अपयश आहे.’’


Multi Language |Offline reading | PDF