बंगालमधील पंचायत निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

निवडणूक प्रक्रियेच्या वेळी होत असलेला हिंसाचार रोखण्यासाठी बंगाल सरकार काहीही करत नसेल, तर नागरिकांनी कोणाकडे पहावे ? बंगालमध्ये अशी स्थिती असणे, हे तृणमूल काँग्रेसला सत्तेत आणल्याची हिंदूंना भोगावी लागत असलेली शिक्षाच होय !

नवी देहली – बंगालमध्ये १ ते ६ मे या कालावधीत ३ टप्प्यांत होणार्‍या पंचायत निवडणुकीमध्ये केंद्रीय सुरक्षा दलांना तैनात करण्यात यावे, अशी मागणी करणारी भाजपची याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे. राज्यात या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांच्या उपस्थितीतच तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांकडून हिंसाचार केला जात असल्याने भाजपने ही याचिका प्रविष्ट केली होती. या याचिकेमध्ये भाजपने न्यायालयाकडे ‘राज्य निवडणूक आयोगाला उमेदवारी अर्ज ऑनलाईन उपलब्ध करण्याचा आदेश द्यावा’, अशीही मागणी केली होती. यावर न्यायालयाने ‘आम्ही निवडणुकीच्या प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करू शकत नाही,  असे सांगत अर्ज भरण्याचा अंतिम दिनांक पुढे ढकलण्यात यावा’, ही मागणीही फेटाळून लावली.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now