शरण येणार्‍या आतंकवाद्यांना जम्मू-काश्मीर सरकार आता ६ लाख रुपये देणार !

साहायता निधीत वाढ करण्याचा प्रस्ताव

शरण येणार्‍या आतंकवाद्यांवर इतकी कृपादृष्टी कशासाठी ? असे असेल, तर प्रत्येक जण आतंकवादी होईल आणि पैसे मिळतात म्हणून शरण येईल, हेही न समजणारे पीडीपी-भाजप सरकार !

नवी देहली – जम्मू-काश्मीर सरकारने शरण येणार्‍या आतंकवाद्यांच्या, तसेच त्यांच्या पुनर्वसनाच्या धोरणात पालट करण्याचा प्रस्ताव सिद्ध केला आहे. यात शरण येणार्‍या आतंकवाद्यांना मिळणारा साहायता निधी दीड लाख रुपयांवरून ६ लाख रुपये करण्याचा प्रस्ताव आहे. यास केंद्र सरकारची संमती घेण्यात येणार आहे. भाजपच्या नेत्यांनी या प्रस्तावास विरोध दर्शवत ‘या सुविधेमुळे आतंकवाद्यांना प्रोत्साहन मिळेल आणि त्यांच्या विरोधात लढणार्‍या सैनिकांच्या मनोबलावर परिणाम होईल’, असे म्हटले आहे. काही दिवसांपूर्वी काही आतंकवाद्यांनी शरण येण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर केंद्र सरकारने राज्य सरकारला या शरण येणार्‍या आतंकवाद्यांच्या पुनर्वसन धोरणात पालट करण्यास सुचवले होते. त्यानंतर राज्य सरकारने एक समिती स्थापन केली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालावरून वरील प्रस्ताव बनवण्यात आला आहे.


Multi Language |Offline reading | PDF