निवडणुकीच्या आचारसंहितेचे कारण पुढे करत श्री हनुमानाच्या मूर्तीची वाहतूक रोखली

भाविकांच्या आंदोलनानंतर मूर्तीच्या वाहतुकीस पोलिसांची अनुमती

  • कर्नाटकमधील पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी यांचा हिंदुद्वेष !
  • आचारसंहितेचे कारण पुढे करून मूर्तीची वाहतूक रोखणार्‍या निवडणूक आयोगाने उद्या मंदिरातील पूजापाठावर बंदी आणल्यास आश्‍चर्य वाटू नये !
  • निवडणूक आयोग आणि पोलीस यांनी असे धारिष्ट्य अन्य पंथियांच्या संदर्भात दाखवले असते का ?

काचरकनहळ्ळी (कर्नाटक) – येथील सर्वज्ञनगर क्षेत्रातील कोदंडराम मंदिरात प्राणप्रतिष्ठापनेसाठी नरसापूर येथून नेण्यात येणार्‍या श्री हनुमानाच्या मूर्तीची वाहतूक निवडणूक आयोग आणि पोलीस यांनी रोखली. ही मूर्ती विश्‍वातील सर्वांत मोठी असून तिची लवकरच प्राणप्रतिष्ठापना करण्यात येणार आहे.

एका बाजूला अधिकारी ‘असा कार्यक्रम करणे, हे आचारसंहितेचे उल्लंघन आहे’, असे सांगत आहेत, तर दुसर्‍या बाजूला ‘श्री हनुमानाच्या मूर्तीच्या प्राणप्रतिष्ठापनेचा कुठल्याही राजकीय पक्षाशी संबंध नसतांना पोलीस आणि निवडणूक आयोगाचे अधिकारी विरोध का करत आहेत ?’, अशी चर्चा भाविकांमध्ये आहे.

याविषयी ‘प्रजा टी.व्ही.’च्या प्रतिनिधीने दिलेल्या माहितीनुसार, ‘श्रीराम चैतन्यवर्धिनी ट्रस्ट’च्या वतीने ६२ फूट उंचीची श्री हनुमानाची मूर्ती एका मोठ्या ट्रकमधून बेंगळूरूजवळच्या ग्रामीण भागातून होसकोटे महामार्गावर जात होती. निवडणूक आयोगाचे अधिकारी आणि पोलीस यांनी २ एप्रिल या दिवशी दुपारी ३ वाजता दंडुपाळ्ये येथे हा ट्रक अडवला. त्या वेळी अधिकार्‍यांनी सांगितले की, महामार्गाद्वारे अशी वाहतूक करण्यासाठी केवळ सार्वजनिक बांधकाम विभागाची अनुमती पुरेशी नसून जिल्हाधिकार्‍यांकडूनही अनुमती घेणे आवश्यक आहे. त्यामुळे ‘ट्रस्ट’चे प्रतिनिधी आता ती अनुमती मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. याचा परिणाम म्हणून सदर मूर्ती असलेला ट्रक दंडुपाळ्ये येथे २ एप्रिलपासून थांबलेला आहे.

भाविकांच्या आंदोलनानंतर निवडणूक आयोग आणि पोलीस यांच्याकडून मूर्तीची वाहतूक करण्यास अनुमती !

या निर्णयाच्या विरोधात भाविकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन केले. विश्‍वस्त निवडणूक आयोगाच्या अधिकार्‍यांना भेटल्यावर त्यांनी ‘मूर्ती नेण्याशी आमचा संबंध नाही. तुम्ही संरक्षण घेऊन अनुमती घेऊन जाऊ शकता’, असे सांगितले. निवडणूक आयोगाच्या या भूमिकेमुळे पोलिसांनीही माघार घेतली. तरीही पोलिसांनी ‘मूर्ती नेण्यासाठी जिल्हाधिकारी नीलमणी राजू यांच्याकडून अनुमती घ्यावी’, अशी आडकाठी आणली. त्यावर संतप्त भाविकांनी ‘रस्ता बंद’ आंदोलन केले. अनुमाने १ घंटा हे सर्व चालले होते. त्यानंतर पोलिसांनी नाईलाजास्तव अनुमती दिली. यामागे एका ख्रिस्ती व्यक्तीचा हात असल्याचा आरोप भाविकांकडून केला जात आहे.


Multi Language |Offline reading | PDF