पाकच्या गोळीबारात महाराष्ट्रातील सैनिक शुभम मुस्तापुरे हुतात्मा

पाककडून सतत होणारा गोळीबार हे पाकने पुकारलेले युद्धच आहे, हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ? आणखी किती सैनिकांचा जीव गेल्यावर सरकार पाकला नष्ट करणार आहे ?

जम्मू – काश्मीरमधील सीमारेषेवर पाकिस्तानने ३ एप्रिल या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत केलेल्या गोळीबारात भारतीय सैनिक हुतात्मा झाला. शुभम मुस्तापुरे (वय २० वर्षे) असे या सैनिकाचे नाव असून ते परभणीतील कोनरेवाडी गावचे रहिवासी होते. शुभम मुस्तापुरे यांच्या पश्‍चात आई सुनीता असून त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. ‘शुभम मुस्तापुरे हे सैन्यातील धाडसी सैनिक होते. देशासाठी त्यांचे बलीदान सदैव स्मरणात राहील’, असे सैन्याने म्हटले आहे. पाकच्या या गोळीबारात ४ सैनिक घायाळ झाले आहेत. यात ३ अधिकार्‍यांचा समावेश आहे. भारतीय सैन्यानेही पाकला चोख प्रत्युत्तर दिल्याचे सैन्याच्या प्रवक्त्यांनी सांगितले.


Multi Language |Offline reading | PDF