गडचिरोली येथे ३ नक्षलवादी ठार

नक्षलवाद्यांचा कायमचा बंदोबस्त करू शकणारे सरकार हवे !

गडचिरोली – येथे सी-६० कमांडो आणि नक्षलवादी यांच्यामध्ये झालेल्या चकमकीत ३ नक्षलवादी ठार झाले. यात २ महिला नक्षलवादी, तर सुनील कुळमेथे हा ३० लाख रुपयांचे बक्षीस असलेला नक्षलवादी होता. कुळमेथे हा नक्षलवाद्यांच्या विभागीय समितीचा सदस्य होता. महिलांपैकी एक त्याची पत्नी स्वरूपा ही होती. सुनील १५ वर्षांपासून नक्षलवादी कारवायांमध्ये सक्रीय होता आणि अनेक घटनांचा तो सूत्रधार होता.


Multi Language |Offline reading | PDF