इराकमधील मृत पावलेल्या भारतियांच्या कुटुंबियांना केंद्र सरकारकडून १० लाख रुपयांचे साहाय्य

आतंकवाद्यांच्या आक्रमणात मारले गेलेल्यांच्या कुटुंबियांना अर्थसाहाय्य करणारे नव्हे, तर तशी वेळच येऊ न देण्यासाठी आतंकवादाचा सर्वंकष बीमोड करणारे सरकार हवे !

नवी देहली – इराकमधील मोसूल या शहरात इसिस या जिहादी आतंकवादी संघटनेने हत्या केलेल्या ३८ भारतियांच्या कुटुंबांना सरकारने प्रत्येकी १० लाख रुपये अर्थसाहाय्य करण्याची घोषणा केली आहे. पंजाब राज्य सरकारने मृतांच्या नातेवाइकांना ५ लाख रुपयांचे आर्थिक साहाय्य, तसेच त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याची घोषणा केली.

इसिसने हत्या केलेल्या ३८ भारतियांच्या मृतदेहांचे अवशेष घेऊन परराष्ट्र राज्यमंत्री व्ही.के. सिंह भारतात परतले. वायुसेनेच्या साहाय्याने हे मृतदेह अमृतसरमध्ये आणले गेले. अमृतसर येथील मृतांच्या कुटुंबियांकडे मृतदेह सोपवण्यात आले. हे अवशेष पाहिल्यानंतर कुटुंबीय आणि नातलग यांच्या अश्रूंचा बांध फुटला. मृतांपैकी अनेकांवर अंत्यसंस्कार करण्यात आले आहेत.


Multi Language |Offline reading | PDF