काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकारने फुटीरतावादी नेत्यांच्या हालचालींवर लादलेले निर्बंध हटवले !

समर्थकांकडून काश्मीरच्या स्वातंत्र्यांच्या घोषणा

पोलिसांवर आक्रमण

फुटीरतवाद्यांच्या समर्थकांच्या देशद्रोही कृती पहाता त्यांच्यावरील निर्बंधांचा काडीमात्र परिणाम झाला नाही, हे स्पष्ट होते ! अशांवर सरकार बंदी का आणत नाही ?

श्रीनगर – जम्मू-काश्मीरमधील भाजप-पीडीपी सरकारने सय्यद अली शाह गिलानी यांच्यासह अन्य फुटीरतावादी नेत्यांच्या हालचालींवर लादलेले निर्बंध ३१ मार्च या दिवशी हटवले. हिजबुल मुजाहिदीनचा बुरहान वानी या आतंकवाद्याला सैन्याने ठार केल्यानंतर जुलै २०१६ मध्ये उसळलेल्या हिंसाचाराच्या पार्श्‍वभूमीवर फुटीरतावादी नेत्यांच्या हालचालींवर सरकारने हे निर्बंध लादले होते.

सुटकेनंतर गिलानी हैदरपोरा येथील स्थानिक मशिदीत नमाजासाठी गेले. त्यांच्यासमवेत इतर समर्थकही होते. या वेळी त्यांनी काश्मीरच्या स्वातंत्र्याच्या घोषणा दिल्या. यानंतर गिलानी यांना मशिदीतून त्यांच्या हैदरपोरा येथील निवासस्थानी घेऊन जाण्यासाठी मोठी मिरवणूक काढण्यात आली. यानंतर गिलानी यांनी एका सभेला संबोधितही केले. त्या वेळी त्यांच्या समर्थकांनी तेथे उपस्थित असलेल्या पोलिसांवर दगडफेक केली. (धर्मांध फुटीरतावादी नेत्यांवर कशाप्रकारे निर्बंध लादावेत, याविषयी सरकार चीनचे अनुकरण करील का ? – संपादक)


Multi Language |Offline reading | PDF