एका शहरात अनेक वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत असलेल्या साधकांची गुप्तचर विभागाच्या पोलिसांकडून चौकशी

वेगवेगळ्या कारणांखाली चौकशीचा ससेमिरा लावून साधकांना त्रास देणारे पोलीस ! आतंकवाद्यांची नव्हे, तर राष्ट्र आणि धर्म यांसाठी निःस्वार्थी वृत्तीने कार्य करणार्‍या सनातनच्या साधकांची चौकशी करून त्यांना नाहक त्रास देणारे पोलीस हिंदुद्वेषी होत !

‘एका शहरात पोलिसांकडून गेल्या अनेक वर्षांपासून सनातनच्या मार्गदर्शनाखाली साधना करत असलेल्या साधकांची, तसेच पूर्वी साधना करत असलेल्या; मात्र सध्या काही कारणांमुळे साधना करत नसलेल्या साधकांची चौकशी केली जात आहे. पोलिसांनी अशा साधकांची यादी केली आहे आणि ते या साधकांच्या घरी जाऊन चौकशी करत आहेत. विशेष म्हणजे या यादीतील काही साधकांचा मृत्यूही झाला आहे.

अशा साधकांपैकी एका साधिकेच्या घरी पोलीस चौकशीसाठी गेले असता या साधिकेने यामागचे कारण विचारले. त्या वेळी पोलिसाने ‘आमच्या खात्याकडून आम्हाला ही यादी दिली आहे आणि या यादीप्रमाणे माहिती घेण्यास सांगितले आहे’, असे सांगितले; मात्र ‘चौकशी कोणत्या कारणासाठी केली जात आहे’, याचे कारण पोलिसांनी सांगितले नाही. पोलीस साधकांच्या घरी जाऊन त्यांची, तसेच त्यांच्या कुटुंबियांची माहिती घेत आहेत, तसेच त्यांच्या शिधापत्रिकेचे (रेशनकार्डचे) छायाचित्रही काढत आहेत.

दुसर्‍या एका साधिकेच्या घरी जाऊन पोलीस म्हणाले की, मला सनातनविषयी अभिमान आहे; म्हणून मी येथे आलो; मात्र तुमच्या परिचयाच्या एका धर्माभिमान्याचे नाव आमच्या यादीत नाही.

तिसर्‍या एका साधकाच्या घरी चौकशीसाठी गेलेल्या पोलिसांनी ‘आता निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळे आम्ही पत्त्यांच्या पडताळणीसाठी (अ‍ॅड्रेस व्हेरिफिकेशनसाठी) आलो आहोत’, असे सांगितले.

गुप्तचर विभागाच्या पोलिसांकडून साधकांच्या घरी जाऊन आणि त्यांच्याशी गोड बोलून माहिती मिळवण्याची क्लृप्ती !

गुप्तचर विभागाच्या पोलिसांकडून साधकांच्या घरी जाऊन त्यांच्या पत्त्यांची खात्री केली जात आहे. एक साधक घरी नसल्याने पोलिसांनी त्यांच्या शेजारील घरात जाऊन साधकाविषची माहिती विचारली. पोलीस ज्या ज्या साधकांच्या घरी गेले होते, त्या सर्वांचे संपर्क क्रमांक मागून घेतले, तसेच जे साधक भेटले नाहीत, त्यांच्याविषयी त्यांच्या कुटुंबियांकडे दिवसभरात २ – ३ वेळा विचारणा केली जात होती. साधकांकडे चौकशी करण्यासाठी गेलेले पोलीस त्यांच्याशी गोड बोलून माहिती काढण्याचा प्रयत्न करत होते. पोलीस सांगत होते, ‘‘तुम्ही काही घाबरू नका. तुम्ही सेवा करा; पण त्यातच अडकू नका. घराकडेही लक्ष द्या. आम्हाला मुख्य कार्यालयातून यादी आली आहे, त्यामुळे आम्ही सर्व चौकशी करत आहोत.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now