पोलिसांनी ‘सुदर्शन’ वाहिनीचे संपादक सुरेश चव्हाणके यांची रथयात्रा रोखली !

मुंबई पोलिसांचा तुघलकी कारभार !

  • पोलिसांनी खोटे कारण सांगून चव्हाणके यांना अज्ञातस्थळी नेले

  • धर्माभिमानी हिंदूंचाही आक्रमक पवित्रा

मुंबई, ३१ मार्च (वार्ता.) – आझाद मैदान येथे मुसलमान संघटनेचे आंदोलन असल्याचे कारण देत मुंबई पोलिसांनी ‘राष्ट्र निर्माण संघटने’चे अध्यक्ष तथा सुदर्शन वाहिनीचे संपादक श्री. सुरेश चव्हाणके यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात येत असलेली ‘भारत बचाओ’ रथयात्रा परळ येथे रोखली. या वेळी ‘मुंबई प्रेस क्लब येथे असलेल्या पत्रकार परिषदेला घेऊन जातो’, असे खोटे सांगून पोलिसांनी श्री. चव्हाणके यांना अज्ञातस्थळी नेले. (हिंदुत्वनिष्ठ आणि एका वृत्तवाहिनीचे संपादक असणारे श्री. चव्हाणके यांच्याशी ते एक अट्टल गुन्हेगार असल्याप्रमाणे वर्तन करणार्‍या पोलिसांची ही कृती निंदनीय होय ! – संपादक) मुसलमानांच्या भीतीने पोलिसांनी रथयात्रेवरील भगवे ध्वज काढण्याचा निंदनीय प्रकार करून मुसलमानांसमोर अक्षरश: नांगी टाकली. या वेळी हिंदुत्वनिष्ठांनी आक्रमक पवित्रा घेत रथयात्रेतील वाहनांचे काढलेले भगवे ध्वज पुन्हा लावण्यास पोलिसांना भाग पाडले.

आझाद मैदानावरील मुसलमानांच्या मोर्च्याशी काहीही संबंध येत नसतांना मुसलमानांच्या दबावासमोर झुकून पोलिसांनी रथयात्रेत संपूर्णपणे सहकार्य करणार्‍या हिंदूंवर मात्र खाकी वर्दीचा बडगा उगारण्याचा प्रयत्न केला. गिरगाव चौपाटीवर रथयात्रेसाठी जमलेल्या हिंदूंना घाबरवण्यासाठी पोलिसांनी श्री. नीलेश गनानी या कार्यकर्त्याला विनाकारण गाडीत टाकले. यावर हिंदूंनी आक्रमक पवित्रा घेतल्यावर श्री. नीलेश गगानी यांना सोडून दिले.

त्याच वेळी आझाद मैदानावरील आंदोनाला जाणार्‍या मुसलमानांच्या गाड्यांवरील फलक आणि हिरवे झेंडे काढण्याचे धारिष्ट्य एकाही पोलिसांनी दाखवले नाही; तर दुसरीकडे रथयात्रेवरील भगवे ध्वज पोलिसांनी स्वत: काढले. (ज्या राज्यात छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची स्थापना केली, त्या राज्यात मुसलमानांच्या भीतीने आज पोलिसांनी भगवे ध्वज उतरवले. भगवे ध्वज उतरवायला हा पाक आहे का ? छत्रपतींचा आदर्श समोर ठेवणारे भाजप सरकार अशा पोलिसांवर कारवाई करणार का ? – संपादक)

पोलिसांनी केली हिंदुत्वनिष्ठांची फसवणूक !

सकाळी विक्रोळी येथून शांततापूर्णरित्या निघालेली रथयात्रा दुपारी १ वाजता आझाद मैदानाच्या शेजारी मुंबई प्रेस क्लब येथे येणार होती. या ठिकाणी श्री. चव्हाणके यांची पत्रकार परिषद होणार होती. त्या आधीच दुपारी १२ वाजताच्या सुमारास वरळी ‘आझाद मैदानावर तिहेरी तलाकविषयी मुसलमान महिलांचे आंदोलन असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होऊ शकतो’, असे कारण देत पोलिसांनी रथयात्रा रोखली. या वेळी पोलीस आयुक्त मिश्रा आणि साहाय्यक पोलीस आयुक्त जोशी यांनी ‘आझाद मैदानावर रथयात्रेतील केवळ २ गाड्या घेऊन जा. आम्ही श्री. चव्हाणके यांना पत्रकार परिषदेला घेऊन येतो’, असे आश्‍वासन दिले. याला रथयात्रेतील सर्वांनी पूर्णत: सहकार्य केले. पोलिसांच्या बोलण्यावर विश्‍वास ठेवून २ गाड्या पत्रकार परिषदेच्या ठिकाणी आल्या; मात्र श्री. चव्हाणके यांना घेऊन येण्याचे आश्‍वासन देणार्‍या पोलिसांनी सुदर्शनके यांना अज्ञानस्थळी नेले. पत्रकार परिषदेला घेऊन न येता पोलीस श्री. चव्हाणकेे यांना घेऊन गिरगाव चौपाटीच्या ठिकाणी नेले. श्री. चव्हाणके यांच्याशी झालेल्या संपर्कानंतर ही गोष्ट लक्ष्यात आली. त्यामुळे पत्रकार परिषद अर्ध्यावर सोडून सर्व हिंदुत्वनिष्ठ गिरगाव चौपाटीवर पोहोचले.

रथयात्रेतील गाड्यांवरील भगवा उतरवण्याचा पोलिसांचा घृणास्पद प्रकार

पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांच्या २ गाड्यांवरील भगवे ध्वज स्वत:च्या हातांनी काढले. एवढ्यावरच पोलीस थांबले नाहीत, तर त्यांनी श्री. चव्हाणके यांना त्यांच्या वाहनावरील भगवा ध्वज काढण्यास सांगितला; मात्र सुदर्शनके यांनी स्पष्ट नकार दिला. ‘जोपर्यंत गाड्यांवरील भगवे ध्वज काढत नाही, तोपर्यंत रथयात्रा पुढे जाऊ देणार नाही’, अशी तुघलकी भूमिका पोलिसांनी घेतली. या वेळी श्री. चव्हाणके यांनी उपस्थित हिंदूंना ‘भगवा ध्वज न लावताच पुढे जायचे का ?’, हा प्रश्‍न विचारला. त्यावर हिंदुत्वनिष्ठांनी ‘जोपर्यंत गाड्यांवर भगवे ध्वज लावले जात नाहीत, तोपर्यंत पुढे जाणार नाही’, असा पवित्रा घेतला. त्यावर पोलिसांनी हिंदुत्वनिष्ठांना पुन्हा भगवे ध्वज दिले. हिंदूंनी ‘पोलिसांनी जसे गाड्यांवरील भगवे ध्वज काढले, तसेच पुन्हा लावले, तरच पुढे जाऊ’, अशी भूमिका घेतली. त्यानंतर पोलिसांनी गाड्यांवर पुन्हा भगवे ध्वज लावले.


Multi Language |Offline reading | PDF