पू. भिडेगुरुजी यांच्या मोर्च्यानंतर दैनिक सनातन प्रभातचे वितरण करणार्‍या सनातनच्या साधकांना दमदाटी !

सांगली पोलिसांकडून वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपी !

सांगली – २८ मार्च या दिवशी पू. भिडेगुरुजी यांच्या समर्थनार्थ सांगलीत मोर्चा काढण्यात आला होता. या दिवशी पू. भिडेगुरुजी यांच्या संदर्भातील विशेष मजकूर दैनिक सनातन प्रभातमध्ये प्रकाशित करण्यात आला होता. हा मजकूर हिंदुत्वनिष्ठांपर्यंत पोहोचण्यासाठी सनातनचे काही साधक मोर्चा संपल्यावर धारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ यांना दैनिक सनातन प्रभात वितरण करत होते. दैनिक सनातन प्रभातचे वितरण करतांना पाहून तेथील बंदोबस्तासाठी असलेल्या पोलिसांनी साधकांना ‘याची तुम्ही अनुमती काढली आहे का ? कुणाला विचारून तुम्ही हे वितरण करत आहात’, असे विचारून दैनिक वितरण न करण्याविषयी दमदाटी केली. साधकांनी ‘आम्ही आयोजकांची अनुमती काढली आहे’, असे सांगितल्यावर ‘पोलिसांची अनुमती घेतली आहे का ?’ असा प्रश्‍न विचारून साधकांना काही काळ दैनिक सनातन प्रभात वितरण करण्यात आडकाठी आणण्याचा प्रयत्न केला. (सार्वजनिक ठिकाणी दैनिकाचे वितरण करण्यासाठी पोलिसांच्या अनुमतीची आवश्यकता का लागते ? असे करून पोलीस एकप्रकारे वृत्तपत्र स्वातंत्र्याची गळचेपीच करत आहेत !  – संपादक)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now