‘‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि रा.स्व. संघ शस्त्रांंचे प्रशिक्षण देतात !’’ – केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन्

राष्ट्रप्रेमी संघाच्या प्रशिक्षणाची तुलना विघातक विचारसरणीच्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाशी करणे, हा हिंदुद्वेषच !

  • केरळमधील डाव्यांच्या हिंस्र कारवायांवर पडदा घालण्यासाठीच केरळच्या मुख्यमंत्र्यांची ही खेळी नाही कशावरून ?
  • डाव्या विचारसरणीच्या केरळच्या मुख्यमंत्र्यांनी रा.स्व. संघावर असे आरोप करून स्वतःचा हिंदुद्वेषच प्रकट केला आहे !

थिरुवनंतपुरम् – केरळ राज्यात पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया आणि रा.स्व. संघ धार्मिक, तसेच सार्वजनिक ठिकाणी शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत आहेत, असे विधान केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन् यांनी २१ मार्च या दिवशी विधानसभेत सदस्यांच्या प्रश्‍नाला उत्तर देतांना केले. ‘अशा संघटनांवर सरकार कठोर कारवाई करील’, अशी चेतावणीही त्यांनी दिली. (पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कारवायांमुळे गुप्तचर यंत्रणांनी त्यांच्यावर बंदी घालण्याची शिफारस केली आहे, हे मुख्यमंत्र्यांना ज्ञात नाही का ? – संपादक)

विजयन् पुढे म्हणाले, ‘‘संघाचे कार्यकर्ते धार्मिक ठिकाणी, शाळांचे मैदान अथवा मोकळ्या जागेत काठ्यांद्वारे शस्त्रास्त्रांचे प्रशिक्षण देत असल्याचे सरकारच्या निदर्शनास आले आहे. हा प्रकार सरकारने गांभीर्याने घेतला आहे. असे प्रकार धार्मिक ठिकाणी होतात. तेथे पूजा केली असल्याने असे प्रशिक्षण देणे चुकीचे आहे. आवश्यकता वाटल्यास धर्मस्थळांच्या ठिकाणी शस्त्रांचे अनधिकृत प्रशिक्षण देण्यावर बंदी आणण्याविषयी सरकार कायदा करू शकते. तसेच असे प्रशिक्षण देणार्‍यांवरही कारवाई करण्याचे सरकारच्या विचाराधीन आहे. काही पोलीस अशा प्रशिक्षणाविषयी माहिती देणार्‍याचे नाव उघड करत असल्याचे निदर्शन आले असून अशा पोलीस अधिकार्‍यांच्या विरोधातही कारवाई करण्यात येईल. जे अशा प्रशिक्षणाविषयीची माहिती देतील, सरकार त्यांचे रक्षण करील.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now