‘प्रतीवर्षीप्रमाणे उत्तम रितीने पार पडलेला महाशिवरात्रीचा देखणा सोहळा !’ – प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये, पुणे

प.पू. आबा उपाध्ये आणि पू. (सौ.) मंगला उपाध्ये

‘प्रतीवर्षीप्रमाणे यंदाही घरातील महाशिवरात्र अत्यंत शांत चित्ताने पार पडली. प्रतीवर्षी मनुष्यबळ भरपूर असे; पण यंदा आम्हाला काळजी होती ती सेवकांची. याची काळजी घरातील वडीलधार्‍या आणि वयस्कर मंडळींना लागली होती; पण आम्ही ही काळजी सद्गुरु सदानंद स्वामी, प.पू. डॉक्टर जयंतराव आठवले आणि भगवान शिव यांच्यावर सोडली होती. आमचे चिरंजीव उदयकुमार आणि सूनबाई भारती, पणतू चैतन्य, आमची मुलगी राजश्री फणसळकर, तसेच आमच्याकडे काम करणार्‍या सौ. सविता सातपुते अन् तिची लहान मुलगी नंदिनी यांनी भरपूर साहाय्य करून सोहळा उत्तम रितीने पार पाडला. तीर्थप्रसादासाठी १५० ते २०० भक्तगण येऊन गेले. प्रतीवर्षी असाच सोहळा पार पडतो. मदतीचा हात असो वा नसो; पण शिवरात्र समाधान देऊन जाते. ‘असा सोहळा प्रत्येक वर्षी पार पडो’, अशी परम पूज्यांंच्या चरणी प्रार्थना !’

महादेवाचा मुखवटा
महावतार बाबाजी आणि भगवान शिव यांच्या प्रतिमा
प.पू. आबांनी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात पाठवलेला झोपाळा

परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी झोपाळा नेतांना त्यांच्या शिकवणीचा आलेला अनुभव !

‘साधकांनी आज माझ्याकडून परम पूज्यांसाठी (परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यासाठी) न्यायचा झोपाळा घरातून काढून नेला. झोपाळा नेतांना माझ्या डोळ्यांतून आनंदाश्रू ओघळले. झोपाळा काढण्यासाठी श्री. प्रदीप वाडकर आणि श्री. प्रशांत फणसळकर हे साधक आले होते. परम पूज्यांनी तीच संस्कृती प्रत्येकाला शिकवली आहे. साधकांची वाणी, सहकार्य, वागणूक आणि भिडस्तपणा हे प्रत्येकानेच शिकले पाहिजे. परम पूज्य, तुम्हाला पुन्हा एकदा धन्यवाद !’

– प.पू. आबा उपाध्ये, पुणे (१८.२.२०१८)

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now