चौथ्या प्रकरणातही लालूप्रसाद यादव दोषी

चारा घोटाळा प्रकरण

सत्तेचा दुरुपयोग भ्रष्टाचार करण्यासाठी करणारे नेते लोकशाही निरर्थक ठरवतात !

नवी देहली – झारखंडमधील डुमका येथील कोषागारातून बेकायदेशीररित्या ३ कोटी १३ लाख रुपये काढल्याच्या प्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री तथा राष्ट्र्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांना केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआयच्या) विशेष न्यायालयाने दोषी ठरवले आहे. या प्रकरणात न्यायालयाने बिहारचे माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची निर्दोष सुटका केली. चारा घोटाळ्यातील एकूण सहा प्रकरणांपैकी हे चौथे प्रकरण आहे. यापूर्वीच्या तिन्ही प्रकरणांत लालूप्रसाद यादव हे दोषी आढळल्याने ते कारागृहात शिक्षा भोगत आहेत. चौथ्या प्रकरणाची सुनावणी ५ मार्चला पूर्ण झाली होती; मात्र लालूप्रसाद यादव यांनी वेळोवेळी केलेल्या याचिकांमुळे त्यावरील निर्णय रखडला होता. शेवटी १९ मार्चला त्यांना दोषी ठरवण्यात आले. याच प्रकरणात माजी मुख्यमंत्री जगन्नाथ मिश्रा यांची निर्दोष सुटका झाली आहे.


Multi Language |Offline reading | PDF