राजदचे उमेदवार सरफराज आलम यांच्या विजयानंतर आररिया (बिहार) येथे ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा : दोघांना अटक

गल्लीबोळातही देशद्रोही घोषणा दिल्या जाणारा जगातील एकमेव देश भारत ! सरकार देशद्रोह्यांवर वचक बसेल, अशी कारवाई करत नसल्यानेच असे प्रकार वारंवार होतात. सरकारसाठी हे लज्जास्पद !

राजद चे सरफराज आलम

पाटलीपुत्र (पाटणा) – आररिया लोकसभा मतदारसंघाच्या नुकत्याच झालेल्या पोटनिवडणुकीत लालूप्रसाद यादव यांच्या राष्ट्रीय जनता दल पक्षाचे उमदेवार सरफराज आलम हे विजयी झाल्यानंतर ‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या घोषणा देण्यात आल्या. या प्रकरणी पोलिसांनी दोघा देशद्रोह्यांना अटक केली आहे. या घोषणेची ध्वनीचित्रफीत सामाजिक संकेतस्थळावर प्रसारित होत आहे. प्राप्त माहितीनुसार, आलम यांच्या विजयानंतर कार्यकर्त्यांनी मिरवणूक काढली. या वेळी ‘पाकिस्तान झिंदाबाद’, तसेच ‘भारत तेरे तुकडे होंगे’, अशा देशद्रोही घोषणा देण्यात आल्या. या मिरवणुकीचे ‘फेसबूक’वर थेट प्रक्षेपण करण्यात आले; मात्र नंतर ते बंद करण्यात आले.

आररिया आतंकवाद्यांचा गड बनेल ! – भाजपचे नेते गिरीराज सिंह

आररियातील निकालानंतर भाजपचे नेते गिरीराज सिंह म्हणाले ‘‘आररिया हा बिहारचा सीमावर्ती भाग असून तो नेपाळ आणि बंगाल यांच्याशी जोडला गेला आहे.

आररिया लोकसभा मतदारसंघातील लोकांनी सरफराज आलम यांना विजयी करून कट्टरपंथी विचारसरणीला जन्म दिला आहे. सरफराज यांचा विजय हा बिहारसाठीच नव्हे, तर देशासाठीही धोका आहे. आररिया आतंकवाद्यांचा गड बनेल.’’

ध्वनीचिफितीची चौकशी झाली पाहिजे ! – आलम

या ध्वनीचित्रफितीविषयी प्रतिक्रिया व्यक्त करतांना सरफराज आलम म्हणाले, ‘‘पाकिस्तान झिंदाबाद’च्या ध्वनीचिफितीची चौकशी झाली पाहिजे. हे भाजपचेच षड्यंत्र आहे.’’

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now